कोंडअसुर्डेत ग्रामस्थांचा मतदानावरच बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

देवरूख - शासकीय जागेवरील कातकरी बांधवांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करून ते हटविण्याबाबत प्रशासनाने कोणतीच कार्यवाही न केल्याने आज कोंडअसुर्डे येथे ग्रामस्थांनी पूर्वसूचना देऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार घातला. 

कसबा गटात मोडणाऱ्या कोंडअसुर्डे येथील केंद्रावर ३८९ मतदारांपैकी कातकरी समाजातील केवळ १२ मतदारांनी आपला हक्‍क बजावला. यामुळे दुपारपर्यंत येथे केवळ ३ टक्‍केच मतदान झाल्याची नोंद होती. 

या गावासाठी मंजूर असलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शासकीय जागा उपलब्ध नसल्याने कार्यान्वित होऊ शकलेले नाही. जि. प. मराठी शाळेजवळ शासनाची १६ गुंठे जागा आहे. येथे पूर्वी धर्मशाळा होती. नंतर काही काळ बांधकाम विभागाच्या ताब्यात या जागेची मालकी होती. ग्रामपंचायतीने ही जागा आरोग्य उपकेंद्रासाठी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केल्यानंतर बांधकाम विभागाने ही जागा मोकळी करून दिली होती. ग्रामपंचायतीने राज्याचे महसूलमंत्री यांच्याकडे या जागेच्या मागणीचा प्रस्ताव लिखित स्वरूपात ग्रामस्थांच्या स्वाक्षरीनिशी पाठवला होता. ग्रामस्थांच्या मागणीनुसार महसूलमंत्र्यांनी सदरहू शासकीय जागा आरोग्य केंद्रासाठी मोकळी करून देण्याबाबत सुमारे १ महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पत्रही दिले होते. या जागेवर सुरवातीला  असलेल्या ४ ते ५ कातकरी कुटुंबांच्या झोपड्यांची संख्या आता १० ते १२ वर गेली आहे. या समाजाच्या पुनर्वसनासाठी नांदगाव आणि खेरशेत पुनर्वसन येथे प्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी तहसीलदार देवरूख यांच्याकडे निवेदन देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर कोंडअसुर्डे गाव बहिष्कार घालणार असल्याचे कळवले होते. या पत्रानंतर नायब तहसीलदार विक्रम पाटील यांनी गावात येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र, यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने आज कोंडअसुर्डे ग्रामस्थांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदानावर बहिष्कार टाकला.

Web Title: vote boycott