नियम तोडणाऱ्यांवर ‘नजर’...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

सावंतवाडी - थेट सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरात पोलिस कायद्याचा बडगा उगारणार आहे. यामुळे चालत्या गाडीवर मोबाइल वापरणाऱ्या तसेच ट्रिपल सिट फिरणाऱ्या अनेकांना यामुळे चाप बसणार आहे. या प्रक्रियेला येथील पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. शहरात लावलेले सीसीटीव्ही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरात सीसीटीव्ही बसविले आहेत. सद्य:स्थिती लक्षात घेता जिल्ह्यात ही यंत्रणा राबविण्यात येत आहे.

शहरातील मुख्य नाक्‍यावर कॅमेरे बसविले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर याचा फायदा पोलिस घेणार आहेत. त्यात अपघात, चोरी आदी अनुचित प्रकारावर नजर ठेवण्याबरोबर शहरात दुचाकी तसेच चार चाकी गाड्या घेऊन फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. 

यात सीसीटीव्हीच्या माध्यमातून चालत्या गाडीवर मोबाइलमध्ये बोलणाऱ्या, ट्रीपल सिट फिरणाऱ्या तसेच गाडी चालविणारी अल्पवयीन मुले आदीवर थेट कारवाई करण्यास मदत होणार आहे. ही कारवाईची प्रक्रिया कोल्हापूर येथे सुरू करण्यात आली आहे. यानंतर आता जिल्ह्यात सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे कळते; मात्र पोलिस विभागाकडून गुप्तता पाळण्यात 
आली आहे.