पाच वाड्यांची टंचाईतून सुटका

पाच वाड्यांची टंचाईतून सुटका

रत्नागिरी - जलस्वराज्य टप्पा 2 मधून बांधण्यात आलेल्या पाऊस पाणी संकलन टाक्या पावसात पूर्ण भरल्या आहेत. आठ गावातील पाच टाक्या शंभर टक्के भरल्या असून टंचाई कालावधीत सव्वापाचशे लोकांचा पाणी प्रश्‍न सुटणार आहे. दोन टाक्या अद्यापही भरावयाच्या असून असुर्डेतील योजना झर्‍यावर आधारित आहे.

पावसाचे पाणी साठवून टंचाई काळात वापरण्याची संकल्पना राबविण्याचा निर्णय जलस्वराज्यमध्ये घेण्यात आला. त्यासाठी जागतिक बँकेने निधी दिला आहे. सतत टंचाई जाणवणार्‍या आणि पाण्याचा दुसरा पर्याय नसलेल्या वाड्यांची निवड यात केली. त्यांचा प्रतिदिन माणसी वीस लीटर पाणी मिळेल असे नियोजन करण्यात आले. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी टाक्या बसविण्यात आल्या.

संगमेश्‍वर, लांजा, खेड, चिपळूण या चार तालुक्यातील वाड्या त्यात आहेत. 1 कोटी 48 लाख रुपयांचा निधी जागतिक बँकेने उपलब्ध करुन दिला आहे. पालू खाकेवाडी, चव्हाणवाडी, बेलारी बुद्रुक कळंबटवाडी, मांडवे गावठाण, टेरव धनगरवाडी येथील टाक्या शंभर टक्के भरल्या आहेत. या वाडीतील सुमारे पाचशेहून अधिक लोकांना मार्च, एप्रिल, मे मध्ये टंचाई भासणार नाही.विहिरी वा अन्य पर्याय नसल्याने संकलन टाकीचा पर्याय उपयुक्त ठरणार आहे.असुर्डेची योजना झर्‍यावरची आहे. तर तिवडीत 50 व टेरवला 76 टक्के पाणी साठले. 

-----------------------------------------

   वाडी         पाणी क्षमता (लिटर)           निधी

-----------------------------------------

* पालु              3 लाख              19 लाख 1 हजार               

* चव्हाणवाडी      1 लाख              10 लाख 93 हजार

* असुर्डे            7 लाख              44 लाख 66 हजार 

* बेलारी बुद्रुक      1 लाख             12 लाख 39 हजार

* मांडवे             5 लाख              28 लाख 80 हजार

* तिवडी            2 लाख              20 लाख 30 हजार

* टेरव              1 लाख              12 लाख 46 हजार

* दत्तवाडी           5 लाख              32 लाख 40 हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com