संगमेश्‍वरातील ४१ वाड्यांत जाणवणार टंचाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

देवरूख - यावर्षीचा कडक उन्हाळा पाहता संगमेश्‍वर तालुक्‍यातील पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्‍त होत आहे. पंचायत समितीने बनविलेल्या टंचाई आराखड्यात यावर्षी २२ गावांतील ४१ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी ३४ लाख ३० हजारांची तरतूद अपेक्षित  धरण्यात आली आहे. हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आला आहे.

तालुक्‍यातील नदीपात्रे कोरडी पडू लागली आहेत. गतवर्षी तालुक्‍यात २ एप्रिलपासून पाण्याचा पहिला टॅंकर धावला होता. यावर्षीही पुढील महिन्यातच टॅंकर धावण्याची शक्‍यता आहे. चालूवर्षीची टंचाई गृहीत  धरून पंचायत समितीने यावर्षीचा आराखडा बनवला आहे. यामध्ये पाचांबे-नेरदवाडी, जखीणटेप, मेढे, पुर्येतर्फे देवळेतील धनगरवाडी, गवळीवाडी,  बेलारी बुद्रुक धनगावाडी, माची, कळंबटेवाडी, शृंगारपूर कातुर्डी कोंड, ओझरे खुर्दमधील बौद्धवाडी, चर्मकारवाडी, निगुडवाडी, भडकंबा-बौद्धवाडी, नवालेवाडी, पाष्टेवाडी, बेर्डेवाडी, संगमेश्‍वर शेनवडे गावातील गवळीवाडी, कानरकोंड, बौद्धवाडी, शेंबवणे-खालचीवाडी, मावळतीवाडी, निवधे धनगरवाडी, कुटगिरी येडगेवाडी, मुर्शी-धनगरवाडी, बौद्धवाडी, दळवीवाडी, हरपुडे-धनगरवाडी, तुरळ-हरेकरवाडी, दख्खन-धनगरवाडी, कळंबुशी-आकटेवाडी, उजगाव-गवळीवाडी, राजीवली-शिर्केवाडी, कावीळटेप, असुर्डे साखळकोंड, करजुवे-गुरववाडी, बावलवाडी, तिसंगवाडी, बौद्धवाडी, बाचीमवाडी यांचा समावेश करण्यात आला आहे.

तालुक्‍यात ऑक्‍टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्प्याचा आराखडा निरंक असून या कालावधीत तालुक्‍यात टंचाई सुरू झालेली नाही. जानेवारी ते मार्च या दुसऱ्या टप्प्यात टंचाई सुरू होण्याची शक्‍यता असून २८ लाखांच्या मागणीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा उपअभियंता जयवंत पाटील यांनी दिली. या मागणीतून विंधन विहीर, नळपाणी योजना, नवीन विहीर बांधणे, दुरुस्ती करणे, तात्पुरती पाणी योजना यांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: water shortage in 41 villages