टॅंकरने पाणीपुरवठा करण्यास दिरंगाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

खेड - खेड तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे; मात्र शासनाकडून टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे ६ एप्रिलपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी गुरुनाथ पारसे यांना भाजपतर्फे देण्यात आला आहे. 

या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी श्री. पारसे यांची भेट घेऊन टंचाईग्रस्त गाववाड्यांना पाणीपुरवठा का केला जात नाही, याचा जाब विचारला. याप्रसंगी भाजपचे प्रभारी शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष विनोद चाळके, रमेश भागवत, संजय बुटाला, राकेश पाटील, वैजेश सागवेकर, उदय बोरकर व चिंचवली ढेबेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. पंचायत समिती प्रशासनाकडे टॅंकरच उपलब्ध नाही. वाहनचालक असला तरी तो वाहन नेण्यास असमर्थ असल्याचे प्रशासनाने सांगितल्यावर भाजपचे कार्यकर्ते संतापले. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. भाजपच्या रौद्रावतारानंतर चिंचवली ढेबेवाडी (धनगरवाडी) या ठिकाणी तत्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे; मात्र आगामी काळात तालुक्‍यातील अन्य गाव-वाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत न राहिल्यास ६ एप्रिलपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे भाजपने दिला.

Web Title: water tanker delay