सहा महिलांनी केला महिलेचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मंडणगड - प्रेमसंबधांच्या संशयावरून सहा महिलांनी एका प्रौढ महिलेचा खून केला. दहींबे येथे ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. रेखा लक्ष्मण मुकना (वय 43) असे मृत महिलेचे नाव आहे. ती आदिवासी समाजातील आहे. सहाही संशयित आदिवासी समाजातील आहेत.

मृत महिलेची मुलगी निशा नितीन मोरे (वय 29) हिने मंडणगड पोलिस ठाण्यात आज तक्रार दाखल केली. फिर्यादीतील माहितीनुसार घटनेतील संशयित, मृत महिला व फिर्यादी हे सर्व एका समाजातील व एका वाडीतील आहेत. रेखा मुकना व शांताराम रावजी जाधव यांचे प्रेमसंबंध असल्याचा गैरसमज करून घेऊन वाडीतील संगीता शांताराम जाधव, शोभा सुरेश मुकना, चंद्री सहदेव मुकना, योगिता योगेश जाधव, वत्सला शंकर जाधव, भागी प्रकाश मुकना (सर्व रा. दहींबे) या सहा महिलांनी रेखा मुकना यांना संगनमताने लाथाबुक्‍क्‍याने मारहाण केली.

Web Title: women murder by women