'आम्ही उपक्रमशील रायगड कन्या' ई अंकाचे प्रकाशन

raigad
raigad

पाली : शैक्षणिक गुणवत्ता वाढ हाच अमुचा ध्यास,त्यासाठी ज्ञान तंत्रज्ञान उपक्रमांची कास या प्रेरणेतून रायगड जिल्हा परिषद शाळेतील काही महिला शिक्षीकांनी मिळून "आम्ही उपक्रमशील रायगड कन्या " हा अंक काढला आहे. या 'ई' अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

रायगड जि.प प्राथमिक महिला शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी राबविलेले प्रेरणादायी उपक्रम या अंकात समाविष्ट केले आहेत. तसेच जिल्ह्यातील निवडक उपक्रमशील तंत्रस्नेही महिला शिक्षिकांनी प्रत्यक्ष राबवलेले अध्ययन अध्यपनासाठी उपयुक्त असे वेगळे विशेष उपक्रम व लेखांचे संकलन या अंकात करण्यात आले आहे. श्रवण-भाषण-वाचन-लेखन या भाषिक कौशल्या बरोबरच गणन संख्यावरील क्रिया, स्पर्धा परीक्षा तयारी, कलेतून शिक्षण, प्रगत महाराष्ट्र, डिजीटल शाळा, इंग्रजी कौशल्य विकास, बचत बँक संभाषण, बाहुलीनाट्य, सहल, प्रयोग शाळा निर्मिती व वापर, अप्रगत विद्यार्थी मार्गदर्शन, तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, कला क्रीडा व वैज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रीय सामाजिक मुल्यांची रुजवण, दिव्यांग विद्यार्थी असे सर्वसमावेशक लेखांचे लेखन या अंकात महिला शिक्षीकांनी केले आहे.

रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या हस्ते आम्ही उपक्रमशील रायगडकन्या या " ई " अंक प्रकाशन सोहळा जिप अध्यक्षांच्या दालनात नुकताच पार पडला. याप्रसंगी तटकरे यांनी या ई अंकाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या अंकाच्या फ्लिपबुकची हि पाहणी करुन उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले. प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित टिम मधील सर्व शिक्षीकांना सन्मानपत्र प्रदान केले गेले.मुख्य कार्यकारी आधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग अभय यावलकर यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करूनया ' ईं ' अंकाला जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला.त्यांनी रायगड महिला तंत्रस्नेहींचे कार्य व शैक्षणिक उपक्रम समजून घेतले मुलींचे शिक्षण शिक्षणात तंत्रज्ञान वापर पालक प्रबोधन यावर मार्गदर्शन व चर्चा केली.

राजिप अध्यक्षा आदिती तटकरे, सभापती शिक्षण व आरोग्य राजिप नरेशा पाटील, तसेच राजिप सदस्य निलीमा पाटील, चित्रापाटील प्रिया पाटील, मोरे मॅडम, डायट पनवेलचे प्राचार्य सुभाष महाजन,प्राथमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे, प्राथमिक उपशिक्षणाधीकारी सुनील गवळी, गटशिक्षणाधिकारी, वरिष्ठ विस्तार अधिकरी,केंद्रप्रमुख अादिंनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रमशील रायगड कन्या या अंकाचे संपादन चित्ररेखा र.जाधव रा.जि.प शाळा आमटेम यांनी केले असुन जयश्री जगदीश म्हात्रे ,उज्वला पाटील,मनिषा अंजर्लेकर, भानुप्रिया मेथा, सायराबानु चौगुले या टिमने अंकासाठी परिश्रम घेतले व त्यांच्या यशस्वी उपक्रमांचे लेख यांच्या लेखात आहेत.

आधी केले मग सांगितले याप्रमाणे प्रत्यक्ष उपक्रम राबवून येणाऱ्या समस्येवर मात करत शैक्षणिक उपक्रम राबवणे, जि.प शाळांचा पट टिकवणे, वाढवणे आणि गुणवत्ता विकास असे त्रिवेणी संगम असलेले लेख यात आहेत. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच टिकविण्यासाठी देखिल या अंकाचा उपयोग सर्व शिक्षक व विदयार्थ्यांना नक्कीच होईल.
- चित्ररेखा र.जाधव, रा.जि.प शाळा आमटेम, ई अंकाच्या संपादिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com