कल्पनाशक्‍तीला गगण ठेंगणे...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

सावर्डे - सह्याद्री पॉलिटेक्‍निक, सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणास लावून रेसिंग कार, सौरऊर्जेवर चालणारी साधने, मोबाइल ॲप्स, साखळी बंधारे, कन्व्हेयर बेल्ट असे एकापेक्षा एक प्रकल्प बनवून रसिकांना चांगलीच मेजवानी दिली.

सावर्डे - सह्याद्री पॉलिटेक्‍निक, सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणास लावून रेसिंग कार, सौरऊर्जेवर चालणारी साधने, मोबाइल ॲप्स, साखळी बंधारे, कन्व्हेयर बेल्ट असे एकापेक्षा एक प्रकल्प बनवून रसिकांना चांगलीच मेजवानी दिली.

प्रदर्शनात रेसिंग कारचे अनावरण सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, चिपळूण सभापती पूजा निकम यांच्या हस्ते झाले. १२०० सीसी क्षमतेची ‘ॲटम-०१७’ ही कार लक्षवेधी ठरली. सौरऊर्जेवर चालणारी व ट्रायसिकल इंजिन कार कौतुकास पात्र ठरली. सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्‍निकमध्ये ‘एस-क्रिएटर‘ प्रदर्शनाचे उद्‌घाटन चिपळूण पंचायत सभापती पूजा निकम यांनी केले. प्रदर्शनामध्ये ३८ प्रकल्प मांडण्यात आले आहेत. पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्यांनी ही साधने बनविली आहेत. प्रदर्शन पॉलिटेक्‍निक कॉलेजमध्ये ४ एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.

इलेक्‍ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन शाखेच्या वतीने कॉडकॉफ्टर (ड्रोन) हेलिकॉफ्टर बनविण्यात आले आहे. अपघाताचे अलर्ट सेन्सर असून, यामध्ये अपघात झाल्यास आणि गाडीचा वेग वाढल्यास घरच्या लोकांना माहिती देण्याचे साधन, माणसे गणकयंत्र, मूक-बधिर हालचाल यंत्र, सिव्हिलच्या वतीने साखळी बंधारे, धरण बांधणी, आदर्श वसाहत, मेकॅनिकल शाखेने गो-कार, सौरऊर्जेवर चालणारी अपंग कार, सायकल पॅडेल वॉशिंग मशीन, शाफ्ट ड्रिव्हन मोटारसायकल अशी साधने आहेत. कॉम्प्युटर व माहिती तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी मोबाइल ॲप्स तयार केले आहे. विद्यार्थ्यांना सह्याद्री पॉलिटेक्‍निक प्राचार्य मंगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अभिजित शिंदे, साईराज देवरूखकर, विशाल मायने, वृषाली शिंदे, महेश साळुंखे, विभागप्रमुख मनोज साळुंखे, सुभाष पाटील, विनायक जाधव, रमेश कबाडे, राजेश पेटकर, दिनेश खानविलकर यांनी परिश्रम घेतले. प्रदर्शनाला चिपळूण पालिका माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, माजी नगरसेवक राजू देवळकर, उद्योजक प्रशांत निकम, सावर्डे सरपंच सुभाष मोहिरे, प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, उमेश लकेश्री, अनिल बत्तासे व ग्रामस्थांनी प्रदर्शनास भेट दिली.

Web Title: yes creator exhibition in sawarde