होय, आम्हाला नगरपंचायतच हवी!, 

pali
pali

पाली (रायगड) : नुकतेच पाली ग्रामपंचायतीची प्रभाग रचना जाहीर झाली. परंतू ग्रामपंचायत स्तरावर पाली गावाच्या विकासाला गती देण्यासाठी पालीकरांना कुठल्याही परिस्थितीत नगरपंचायत हवी आहे. पाली नगरपंचायत होण्यासाठी पालीकर जनतेसह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांची सोमवारी (ता. 2) येथील राममंदीरात  बैठक पार पडली. 

या बैठकीत पाली गावाला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा याकरीता सर्वांनी एकत्रीतपणे लढा देण्याची तयारी केली आहे. तसेच यावेळी सर्वपक्षिय कार्यकर्ते व नागरिक यांना सामावून घेणारी कमिटी जाहिर करण्यात आली. पाली नगरपंचायत होण्यासाठी पुढील दिशा ठरवून हे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

प्रकाश कारखानीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस भा.ज.पा नेते विष्णु पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ग.रा.म्हात्रे, भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राउत, भा.ज.पा सुधागड तालुकाध्यक्ष राजेश मपारा, कॉग्रेस सुधागड तालुकाध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरिफ मनियार, प्रकाश ठोंबरे, पाली ग्रा.पं. उपसरपंच सचिन जवके, संजय घोसाळकर, आर.को.मराठे, अभिजीत चांदोरकर, अनुपम कुलकर्णी, राजेंद्र गांधी, आलाप मेहता, सुशिल शिंदे, पराग मेहता, निखिल शहा आदिंसह सर्वपक्षिय नेते, कार्यकर्ते व पालीकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. 

सर्वांगीण विकासासाठी हवी नगर पंचायत
पर्यटन विकासाच्या धर्तीवर सर्व नागरी सोईसुविधांसह पाली स्मार्ट सिटी म्हणून उभी राहावी तसेच अष्टविनायक देवस्थानापैकी प्रख्यात धार्मीक स्थळ असलेल्या पालीला अधिक नावारुपाला येण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी टुरीझमचा विकास होउन शुध्द पाणी, रुंद रस्ते व्हावेत अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. याबरोबरच अरुंद रस्त्यांमुळे सतत होणारी वाहतुक कोंडी, अनेक वर्ष खोळंबलेली अकरा कोटीहून अधिक रकमेची शुध्द पाणीपुरवठा योजना, जुनाट सांडपाणी व्यवस्था, योग्य कचराव्यवस्थापन, अरुंद व कमी उंचीचा आंबा नदी पुल ज्याच्यावरुन दरपावसाळ्यात पाणी जावून लोकांची होणारी गैरसोय, ग्रामपंचायतीच्या अपुर्‍या व तुटपूंज्या उत्पन्नाने गावाच्या विकासाला आलेल्या मर्यादा. अशा एक ना अनेक समस्यांनी पाली गाव वेढलेले आहे.

त्यामुळे या समस्या व प्रश्न मार्गी लावण्यासाठी  पाली नगरपंचायत होणे काळाची गरज आहे. ज्यामध्ये रस्ता रुंदिकरण, देवस्थानचा विकास, चांगली हॉटेल्स, अत्याधुनिक सांडपाणी व्यवस्था, मुलभूत नागरी सोयी सुविधा रुंद व पर्यायी रस्त्यांची निर्मिती, पर्यटन विकास व शुद्ध पाणी पुरवठा योजना. हे सर्व अंमलात येईल. तसेच  स्वच्छ आणि शुद्ध पाणी योजना, कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन व कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे व्यवस्था करुन नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरविकास खात्याकडून आलेल्या निधीचा वापर विकास कामांसाठी केल्यास नागरिकांचे जीवनमान उंचावून त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारेल आणि पाली गावाची वाटचाल नक्कीच विकसाकडे होईल. 

सद्यस्थितीत ग्रामपंचायतीचा फंड अपुरा पडत आहे. विविध करांच्या माध्यमातून जमा होणार्‍या तुटपूंज्या निधीतून ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांचे पगार देखील काढणे अवघड होत आहे. परिणामी पालीत नगरपंचायत अस्तित्वात आल्यास भरघोस निधी प्राप्त होऊन विकासकामे होतील, नागरी समस्या सोडविता येतील व नागरिकांना चांगल्या सोयी - सुविधा मिळू शकतील. असा विश्वास पालीकर जनतेला निर्माण झाला आहे. 

पाली ग्रामपंचायत ते नगरपंचायतीचा प्रवास (आढावा)
पाली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये होण्याचा शासनाचा प्रस्ताव २०१५ ला आला. त्यावर ग्रामसभेमध्ये नागरिकांच्या हरकती घेण्यात आल्या. सर्वानुमते नगरपंचायत होण्यास हिरवा कंदिल दाखविण्यात आला. लवकरच प्रभाग निर्मिती होऊन निवडणुका लागतील अशी परिस्थिती होती. 

पाली शहराचा प्रशासकीय कारभार चालविण्यासाठी प्रशासक म्हणून सुधागड तहसिलदार यांची नेमणुक करण्यात आली. यावेळी पाली नगरपंचायत स्थापना व प्रशासक नेमणुकीला हरकत घेवून  मा. उच्च न्यायालयात तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी रिट पिटीशन क्र. 7061 /2015  दाखल केली होती. ग्रामपंचायतीचा कार्यकाल पु्र्ण होईपर्यंत नगरपंचायत होऊ नये असा त्यामागील उद्देश होता. या याचिकेवर दि.14/03/2016 रोजी उच्चन्यायालयाने निकाल दिला. यानुसार नगरपंचायत स्थापनेची व प्रशासक म्हणून तहसिलदार यांची केलेली नेमणुकीची अधिसुचना रद्द केलेली आहे. सद्यस्थितीत पालीत ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार सुरु आहे. जून किंवा जुलै मध्ये ग्रामपंचयतीचा कार्यकाल पूर्ण होत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com