चेन्नई खेळपट्टीला कोळशाचा शेक

पीटीआय
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटीसाठी प्रतिस्पर्धी संघाचा सराव रद्द झाला आहे. या परिस्थितीत कसोटी वेळेवर सुरू होण्यासाठी चेन्नईतील ग्राउंड्‌समननी तिला कोळशाचा शेक देण्यास सुरवात केली आहे.

चेन्नईला नुकताच चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यामुळे स्टेडियमलाही फटका बसला आहे. ग्राउंडही चांगलेच ओले झाले होते. खेळपट्टी आच्छादित असली तरी जोरदार पावसामुळे खेळपट्टीच्या भागात पाणी झिरपले आहे. आज बुधवारी सकाळी काळे ढग आले होते. त्यामुळे चेन्नईच्या ग्राउंड्‌समननी खेळपट्टीला कोळशाने शेक दिला.

सकाळी सूर्य ढगाआड गेला होता. त्यामुळे खेळपट्टी सुकवण्यासाठी आम्ही कोळशाच्या चार थाळ्यातून त्याला शेक दिला. ढग दूर झाल्यावर त्याची काही आवश्‍यकता भासली नाही. कसोटी सुरू होण्यापूर्वी मैदान पूर्णपणे तयार असेल, असे ग्राउंड्‌समननी सांगितले. तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे सचिव काशी विश्‍वनाथ यांनी स्टेडियम परिसरात अनेक कामे करावी लागतील. ती युद्धपातळीवर सुरू केली आहेत, असे सांगत लढत वेळेवर सुरू होईल, अशी ग्वाही दिली.

चक्रीवादळाने साईट स्क्रीन खराब झाले आहेत. प्रकाशझोत टॉवरवरील काही दिवे पडले आहेत. अनेक ठिकाणची वातानुकूलित यंत्रणा बिघडली आहे. यासारख्या अनेक गोष्टी आहेत, असे तमिळनाडू संघटनेचे पदाधिकारी सांगतात.

तीन स्टॅंडवर प्रवेश नाही
तमिळनाडू क्रिकेट संघटना आणि चेन्नई नगर प्रशासनातील संघर्ष अद्याप संपलेला नाही. त्यांनी तीन स्टॅंडना अद्याप सुरक्षा प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे या तीन स्टॅंडची तिकीट विक्री होणार नाही. अर्थात, विश्वकरंडक ट्‌वेंटी-20 लढतीच्या वेळीही हे घडले होते.

क्रीडा

लंडन - इंग्लंडमधील ट्‌वेंटी ट्‌वेंटी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - पी. व्ही. सिंधू तसेच बी. साईप्रणीत आणि अजय जयराम यांनी भारतीय बॅडमिंटनची ताकद दाखवत जागतिक स्पर्धेतील आपली मोहीम सुरू...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - निवड समितीने सादर केलेल्या शिफारसीनुसार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी पॅरालिंपियन देवेंद्र झाझरिया आणि माजी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017