जोगिंदरची ओव्हर अन् भारताने जिंकलेला विश्वकरंडक

रविवार, 24 सप्टेंबर 2017

दक्षिण आफ्रिकेत 2007 मध्ये झालेल्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने विश्वकरंडक जिंकला होता. आज या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात सध्या पोलिस दलात काम करत असलेल्या जोगिंदर शर्माला अखेरचे षटक देऊन धोनीने सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते. पण, मिस्बाला बाद करून त्याने धोनीचा विश्वास सार्थ ठरविला होता.

जोगिंदर शर्मा या नवख्या गोलंदाजाला कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विश्वास ठेवून दिलेले अखेरचे षटक अन् पाकिस्तानचा कर्णधार मिस्बा उल हकचा झेल श्रीशांतने घेतल्याने भारत विश्वविजेता झाला. या घटनेला आज (24 सप्टेंबर) दहा वर्षे पूर्ण झाली.

दक्षिण आफ्रिकेत 2007 मध्ये झालेल्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने विश्वकरंडक जिंकला होता. आज या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात सध्या पोलिस दलात काम करत असलेल्या जोगिंदर शर्माला अखेरचे षटक देऊन धोनीने सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते. पण, मिस्बाला बाद करून त्याने धोनीचा विश्वास सार्थ ठरविला होता. भारतीय संघाचा तो विजय दहा वर्षांनंतर अजूनही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे.

ट्वेंटी-20 या नव्या क्रिकेटमधील पद्धतीत प्रथमच भारतीय संघ उतरला होता. भारताला या स्पर्धेत फक्त साखळीत न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. भारताने साखळीत सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. मात्र, अंतिम सामन्यातही भारताला पाकिस्तानविरुद्ध झुंजावे लागले होते. अंतिम सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना गौतम गंभीरच्या 75 धावांच्या खेळीमुळे 158 धावा केल्या होत्या. भारताचे या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने अखेरपर्यंत झुंज दिली होती. अखेरच्या षटकात 13 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर मिस्बाने षटकार खेचून 4 चेंडूत 6 धावा असे समीकरण बनविले होते. पण, जोगिंदरच्या गोलंदाजीवर मिस्बा शॉर्ट फाईन लेगला झेल देऊन बाद झाला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

भारतीय संघाने या विजयानंतर मैदानाला फेरी मारत आनंदोत्सव साजरा केला होता. धोनीचे त्यावेळी असलेले लांब केस आजही क्रिकेटप्रेमींना आठवतात. ट्वेंटी-20 विश्वकरंडकाची सुरवात झाल्यानंतर पहिल्यांदाच भारताला हा विश्वकरंडक पटकाविता आला होता.