दुखापतीमुळे एबी डिव्हिलियर्स संघातून बाहेर

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

जोहान्सबर्ग : कोपरा दुखावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेस मुकावे लागणार आहे. पुढील आठवड्यात डिव्हिलियर्सवर शस्त्रक्रिया होणार असून त्यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान सहा ते आठ आठवडे लागणार आहेत. 

ऑस्ट्रेलिया आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात पाच एकदिवसीय सामने आणि तीन कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्यासह न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी आणि आयर्लंडविरुद्धचा एक एकदिवसीय सामना यातही डिव्हिलियर्स खेळू शकणार नाही. 

डिव्हिलियर्सची तंदुरुस्ती चाचणी झाल्यानंतर त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे व्यवस्थापक महंमद मोसाजी म्हणाले, "आज सकाळी डिव्हिलियर्सची तंदुरुस्ती चाचणी झाली. यात तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फलंदाजी करताना त्याच्या हातात वेदना होत आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती द्यावी लागणार आहे. पुढील आठवड्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल.‘‘