ऑस्ट्रेलियाच्या व्होजेस, डोहेर्टीची एकाच दिवशी क्रिकेटमधून निवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या ऍडम व्होजेस आणि झेवियर डोहेर्टी या दोघा क्रिकेटपटूंनी एकाच दिवशी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेटमधील शेफिल्ड शिल्ड स्पर्धा सुरू असून, ती संपल्यावर आम्ही स्थानिक क्रिकेट स्पर्धेतही खेळणार नाही, असे त्यांनी सांगितले. व्होजेसने 20 कसोटी सामने खेळताना 5 शतके, 4 अर्धशतकांसह 1485 धावा केल्या.

त्याने 31 एकदिवसीय सामने खेळताना एका शतकासह 870 धावा केल्या आहेत. झेवियर डोहेर्टी याने चारच कसोटी सामने खेळले असून, यात 7 गडी बाद केले आहेत. झेवियर 60 एकदिवसीय सामने खेळला. यात त्याने 55 गडी बाद केले आहेत. या दोघांबरोबरच ख्रिस हार्टले या स्थानिक खेळाडूनेही निवृत्ती जाहीर केली आहे.