कुंबळेचे मासिक मानधन 48.75 लाख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मुंबई - भारतीय क्रिकेट मंडळ अनिल कुंबळेला प्रतिमहा 48.75 लाख मानधन देत असल्याचे त्यांच्या हिशेबातून दिसत आहे. मंडळाने संकेतस्थळावर जानेवारी ते मार्चमधील खर्च दिले आहेत. त्यानुसार कुंबळेला डिसेंबर तसेच जानेवारीचे मानधन म्हणून प्रत्येकी 48.75 लाख दिल्याचा उल्लेख आहे. राहुल द्रविडला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा मार्गदर्शक असल्याबद्दल 41.44 लाख, तर भारत अ, तसेच कुमार संघाचा मार्गदर्शक असल्याबद्दल 1.89 कोटी देण्यात आले. इंग्लंड मालिकेच्या समालोचनासाठी सुनील गावसकर व रवी शास्त्री यांना प्रत्येकी 56.93 लाख, तर संजय मांजरेकर यांना 42 लाख देण्यात आले.