ऑस्ट्रेलियाचा डाव 276 धावांत संपुष्टात; 87 धावांची आघाडी

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

भारत पहिला डाव 189 
ऑस्ट्रेलिया पहिला डाव - सर्वबाद 276 

डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. अश्‍विन 33, मॅट रेनशॉ यष्टिचित साहा गो. जडेजा 60 -196 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, स्टीव्ह स्मिथ झे. साहा गो. जडेजा 8, शॉन मार्श झे. नायर गो. यादव 66 -197 चेंडू, 4 चौकार, पीटर हॅंड्‌सकॉम्ब झे. अश्‍विन गो. जडेजा 16, मिशेल मार्श पायचीत गो. शर्मा 0, मॅथ्यू वेड पायचीत 40, मिशेल स्टार्क झे. जडेजा गो. अश्विन 26, नॅथन लायन पायचीत गो. जडेजा 0, हेझलवूड झे. राहुल गो. जडेजा 1, ओकीफ नाबाद 4, अवांतर 22 एकूण 122.4 षटकांत 276 

गोलंदाजी - ईशांत शर्मा 27-8-48-1, उमेश यादव 24-7-57-1, आर. अश्‍विन 49-13-84-2, रवींद्र जडेजा 21.4-1-63-6, करुण नायर 1-0-7-0.

बंगळूर - अखेर तिसऱ्या दिवशी सूर गवसलेल्या भारतीय फिरकीपटूंना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 276 धावांत संपुष्टात आणण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाने भारतावर 87 धावांची आघाडी घेतली आहे. रवींद्र जडेजाने सहा बळी मिळविले.

ऑस्ट्रेलियाने आज (सोमवार) तिसऱ्या दिवशी 6 बाद 237 वरून पुढे खेळताना मोठी आघाडी घेण्याच्या दिशेने आगेकूच केली होती. पण, रिव्ह्यूमध्ये जिवदान मिळालेल्या स्टार्कला अखेर आश्विनने बाद केले. त्यानंतर जडेजाने ऑस्ट्रेलियाचे शेपूट गुंडाळण्याचे काम केले. जडेजाने मॅथ्यू वेडला 40 धावांवर पायचीत बाद केले. त्यानंतर लायन आणि हेझलवूडहेही बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 276 धावांत संपुष्टात आला. 

त्यापूर्वी, दुसऱ्या दिवशी बॅट आणि बॉलमध्ये रंगलेला संघर्ष हेच बंगळूर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. पहिल्या दिवशी खराब फलंदाजी करून पायावर धोंडा पाडून घेतलेल्या भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी कमालीचा अचूक मारा करून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना त्रस्त केले; पण त्यांनीदेखील तेवढ्याच संयमाने त्यांना प्रत्युत्तर देत दिवस अखेरीस 48 धावांची आघाडी मिळविली होती. फलंदाजी कठीण झालेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी आज प्रयत्नांची पराकाष्ठा केली. वेळोवेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या तंत्राची आणि एकवेळ आपल्या "डीआरएस' घेण्याच्या कौशल्याची कसोटी बघितली. एरवी आक्रमक खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक फलंदाजाने दाखवलेला संयम या वेळी निर्णायक ठरला.

धावफलक 
भारत पहिला डाव 189 
ऑस्ट्रेलिया पहिला डाव - सर्वबाद 276 
डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. अश्‍विन 33, मॅट रेनशॉ यष्टिचित साहा गो. जडेजा 60 -196 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, स्टीव्ह स्मिथ झे. साहा गो. जडेजा 8, शॉन मार्श झे. नायर गो. यादव 66 -197 चेंडू, 4 चौकार, पीटर हॅंड्‌सकॉम्ब झे. अश्‍विन गो. जडेजा 16, मिशेल मार्श पायचीत गो. शर्मा 0, मॅथ्यू वेड पायचीत 40, मिशेल स्टार्क झे. जडेजा गो. अश्विन 26, नॅथन लायन पायचीत गो. जडेजा 0, हेझलवूड झे. राहुल गो. जडेजा 1, ओकीफ नाबाद 4, अवांतर 22 एकूण 122.4 षटकांत 276 

गोलंदाजी - ईशांत शर्मा 27-8-48-1, उमेश यादव 24-7-57-1, आर. अश्‍विन 49-13-84-2, रवींद्र जडेजा 21.4-1-63-6, करुण नायर 1-0-7-0.

Web Title: Australia bowled out for 276, take a lead of 87 runs; Jadeja takes 6 wickets