ऑस्ट्रेलिया दिवसअखेर 9 बाद 256

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

मिशेल स्टार्क (नाबाद 57 धावा - 58 चेंडू) याने झळकाविलेल्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियास अडीचशेचा टप्पा ओलांडण्यात यश आले. आज दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क व हेझलवूड (1 धाव - 31 चेंडू) ही अखेरची जोडी मैदानात खेळत आहे

पुणे - भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या प्रथम दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमावित 256 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताचा जलदगती गोलंदाज उमेश यादव याने अचूक गोलंदाजी करत मिळविलेले 4 बळी हे आजच्या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करताना सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (38 धावा - 77 चेंडू) आणि मॅट रेनशॉ (68 धावा - 156 चेंडू) यांनी 82 धावांची सलामी देत भक्कम पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वॉर्नर बाद झाल्यानंतर इतर फलंदाज नियमित अंतराने बाद होत राहिल्याने मोठी धावसंख्या उभारण्यात ऑस्ट्रेलियास अपयश आले. किंबहुना, मिशेल स्टार्क (नाबाद 57 धावा - 58 चेंडू) याने झळकाविलेल्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियास अडीचशेचा टप्पा ओलांडण्यात यश आले. आज दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क व हेझलवूड (1 धाव - 31 चेंडू) ही अखेरची जोडी मैदानात खेळत आहे.

भारताकडून रवीचंद्रन आश्‍विन (59 धावा - 2 बळी), जयंत यादव (58 धावा -1 बळी), रवींद्र जडेजा (74 धावा - 2 बळी) यांनी उमेश यास योग्य साथ देत ऑस्ट्रेलियास रोखण्यात योगदान दिले.

क्रीडा

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीतून अद्याप पूर्ण तंदुरुस्त झाला नसल्याने आगामी भारत...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

दिल्लीचा विजय, तर गुजरातची बरोबरी अहमदाबाद - घरच्या मैदानावर गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सला आपली विजयी मालिका अखेरच्या दिवशी कायम...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमे विराट कोहलीबद्दल सतत टीका करत असली, तरी माझ्यासह त्याचे ऑस्ट्रेलियात असंख्य चाहते असल्याचे...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017