विराट संघर्षाची ही तर सुरवात - मिशेल स्टार्क

पीटीआय
बुधवार, 1 मार्च 2017

नवी दिल्ली - भारताच्या खडतर दौऱ्याच्या प्रारंभीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने भारताचा कर्णधार विराट कोहली याला शून्यावर बाद केले. पण, स्टार्क या पहिल्या यशावर समाधानी नाही. कोहलीबरोबरच्या संघर्षाची ही तर सुरवात आहे, असे मत त्याने व्यक्त केले.

गेल्याच आठवड्यात पुणे येथे झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात स्टार्कने पहिल्या डावात चेतेश्‍वर पुजारा आणि कोहली यांना एका चेंडूच्या अंतराने बाद केले होते. त्यानंतर भारतावर ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज वीज कोसळावी तसा कोसळला होता. 

यंदाच्या मोसमात पूर्ण भरात असणाऱ्या कोहलीची विकेट या सामन्यात दोन्ही डावांत झटपट मिळाल्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा आत्मविश्‍वास उंचावला होता. स्टार्क म्हणाला, ‘‘मालिकेत अजून सहा डाव व्हायचे आहेत. या प्रत्येक डावात आमच्यासाठी कोहलीची विकेट महत्त्वाची असेल. त्याला लवकर बाद केले तरंच मालिका आमची होणार आहे. पुजारावर वर्चस्व राखणे सोपे आहे. पण, कोहली असा फलंदाज आहे की तो अपयशाने अधिक पेटून उठतो. त्याच्यात मुसंडी मारण्याची क्षमता आहे.’’

स्टार्क आणि कोहली हे ‘आयपीएल’मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाकडून एकत्र खेळायचे. एकदा का नजर बसली की कोहली कसा धोकादायक आहे हे स्टार्क चांगले जाणून आहे. तो म्हणाला, ‘‘कोहली सर्वोत्तम फलंदाज आहे. आधीच त्याने या मोसमात धावांचा डोंगर उभा केला आहे. चार मालिकांत त्याने दुहेरी शतक झळकावले आहे. पहिल्या कसोटीत तो अपयशी ठरला म्हणजे प्रत्येक कसोटीत ठरेलच असे नाही. त्यामुळे येणारी प्रत्येक कसोटी आमच्यासाठी महत्त्वाची असेल.’’

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी कसोटी बंगळूर येथे होणार असून, रांची आणि धरमशाला येथे अन्य दोन सामने होतील.

क्रीडा

दिल्लीचा विजय, तर गुजरातची बरोबरी अहमदाबाद - घरच्या मैदानावर गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सला आपली विजयी मालिका अखेरच्या दिवशी कायम...

10.51 AM

मुंबई - ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमे विराट कोहलीबद्दल सतत टीका करत असली, तरी माझ्यासह त्याचे ऑस्ट्रेलियात असंख्य चाहते असल्याचे...

10.51 AM

दहा सेकंद असताना गोल; युरोप हॉकी दौऱ्याची यशस्वी सांगता मुंबई - भारतीय हॉकी संघाने युरोप दौऱ्याची यशस्वी सांगता करताना माजी...

10.51 AM