भुवनेश्‍वरचे पाच बळी; न्यूझीलंड 7 बाद 128

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

कोलकाता: पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमारच्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज (शनिवार) नांगी टाकली. यामुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची 7 बाद 128 अशी अवस्था झाली. भारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड पहिल्या डावात अजून 188 धावांनी पिछाडीवर आहे.

कोलकाता: पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमारच्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज (शनिवार) नांगी टाकली. यामुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची 7 बाद 128 अशी अवस्था झाली. भारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड पहिल्या डावात अजून 188 धावांनी पिछाडीवर आहे.

आजच्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाल्यानंतर यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने फलंदाजीती उपयुक्तता दाखवून दिली. त्याने 85 चेंडूंत 54 धावा केल्या. त्याने जडेजा, भुवनेश्‍वर आणि महंमद शमीला साथीला घेत संघाच्या धावसंख्येत 77 ने भर घातली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने तीन तर ट्रेंट बोल्ट, नील वॅग्नर आणि जीतन पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

न्यूझीलंडच्या डावाची सुरवात खराब झाली. दुसऱ्या, तिसऱ्या आणि सातव्या षटकात भारताने न्यूझीलंडला धक्के दिले. यामुळे न्यूझीलंडची अवस्था तीन बाद 23 अशी झाली होती. कर्णधार रॉस टेलर (36) आणि ल्युक रॉंची (35) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ही जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. यष्टिरक्षक बीजे वॉटलिंग हा एकमेव नियमित फलंदाज शिल्लक आहे. भुवनेश्‍वर कुमारने दहा षटकांमध्येच न्यूझीलंडचा निम्मा संघ बाद केला. रवींद्र जडेजा आणि महंमद शमी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पावसामुळे आजच्या दिवसात 53 षटकांचाच खेळ झाला.

संक्षिप्त धावफलक :
भारत : पहिला डाव : 104.5 षटकांत सर्वबाद 316

शिखर धवन 1, मुरली विजय 9, चेतेश्‍वर पुजारा 87, विराट कोहली 9, अजिंक्‍य रहाणे 77, रोहित शर्मा 2, आर. आश्‍विन 26, वृद्धिमान साहा नाबाद 54, रवींद्र जडेजा 14, भुवनेश्‍वर कुमार 5, महंमद शमी 14
अवांतर : 18
गोलंदाजी :
ट्रेंट बोल्ट 2-46, मॅट हेन्री 3-46, नील वॅग्नर 2-57, मिशेल सॅंटनर 1-83, जीतन पटेल 2-66

न्यूझीलंड : पहिला डाव : 34 षटकांत 7 बाद 128
मार्टिन गुप्टील 13, टॉम लॅथम 1, हेन्री निकोल्स 1, रॉस टेलर 36, ल्युक रॉंची 35, मिशेल सॅंटनर 11, बीजे वॉटलिंग खेळत आहे 12, मॅट हेन्री 5, जीतन पटेल 5
अवांतर : 14
गोलंदाजी :
भुवनेश्‍वर कुमार 5-33, महंमद शमी 1-46, रवींद्र जडेजा 1-17, आर. आश्‍विन 0-23

Web Title: Bhuvneshwar Kumar takes five wickets; New Zealand 7 for 128