आता ब्रॅड हॉजची दिलगिरी

पीटीआय
शुक्रवार, 31 मार्च 2017

नवी दिल्ली - कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंवर शेरेबाजी आणि आरोप करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या आजी-माजी खेळाडूंनी आयपीएलचे पडघम वाजू लागताच आपल्या भूमिकांमध्ये सोईस्कर बदल करण्यास सुरवात केली. माजी खेळाडू ब्रॅड हॉजने तर विराटवर केलेल्या आरोपांवर जाहीर दिलगिरी व्यक्त केली.

आयपीएलमध्ये गुजरात लायन्स संघाचे प्रशिक्षक असलेल्या हॉज यांनी विराटने आयपीएलसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी चौथ्या कसोटीतून माघार घेतल्याचे विधान केले होते. आता या वक्तव्याचा आपल्याला खेद वाटतो आणि विराटची माफी मागतो, असे त्यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.

मैदानावर येण्यासाठी शंभर टक्के तंदुरुस्ती मिळवण्यासाठी मला अजून काही आठवडे लागतील, असे विराटने धरमशाला येथील चौथा कसोटी सामना आणि मालिका जिंकल्यानंतर स्पष्ट केल्यामुळे हॉज यांना आपल्या चुकीच्या आरोपांची जाणीव झाली आणि त्यांनी लगेचच दिलगिरीची भाषा सुरू केली.

आपल्या कर्णधाराने मैदानात उतरून आघाडीवर राहून लढावे, असे प्रत्येकाला वाटत असते; परंतु त्याला झालेल्या दुखापतीची आपल्याला माहिती नसते. अशा परिस्थितीत जर एका सामन्यातून माघार घेतली तर पुढच्या सामन्यासाठी (आयपीएल) तुम्ही तयारी करत असू शकता, असा एखाद्याचा भ्रम होऊ शकतो, असे हॉजने म्हटले आहे.

विराटच्या दुखापतीची सत्य परिस्थिती जाणल्यानंतर खजिल झालेल्या हॉज यांनी सर्व भारतीय, भारतीय प्रेक्षक आणि क्रिकेट संघ आणि खास करून विराट कोहली यांची मी दिलगिरी व्यक्त केली. माझा हेतू कोणाला दुखावण्याचा आणि टार्गेट करण्याचा नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Brad Hodge apology