स्टीव्ह स्मिथवर नेतृत्वाचा 'वर्कलोड' - पॉंटिंग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही प्रकारच्या नेतृत्वाबरोबर आता आयपीएलमध्येही कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या स्टीव्ह स्मिथवरील नेतृत्वाच्या जबाबदारीबाबत ("वर्कलोड') माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने चिंता व्यक्त केली आहे.

सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही प्रकारच्या नेतृत्वाबरोबर आता आयपीएलमध्येही कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या स्टीव्ह स्मिथवरील नेतृत्वाच्या जबाबदारीबाबत ("वर्कलोड') माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने चिंता व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी, एकदिवसीय व ट्‌वेन्टी-20 संघाचे नेतृत्व करणाऱ्या स्टीव्ह स्मिथकडे आता आयपीएलमधील पुणे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनीला बाजूला करून स्मिथची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

पुणे संघाच्या कर्णधारपदाचा स्मिथला किती फायदा होईल या प्रश्‍नावर पॉंटिंगने आपण याबाबत साशंक असल्याचे मत व्यक्त केले. तिन्ही प्रकारांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणे फार आव्हानात्मक असते आणि अशा परिस्थितीत आणखी दोन महिने ही जबाबदारी सांभाळायची आहे. स्मिथ यातून कसा मार्ग काढणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे, असे पॉंटिंग म्हणाला.

गतवर्षी भारतातील ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर स्मिथने ट्‌वेन्टी-20 प्रकारातील कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याची आठवण काढताना पॉंटिंग म्हणाला, "सध्या तरी तो कर्णधारपदाच्या जबाबदारीमध्ये सुवर्णमध्य साधत आहे. तसेच आयपीएलमध्ये पुणे संघाचा तो यशस्वी कर्णधार होईल.' ट्‌वेन्टी-20 प्रकारांत नेहमीच दोन षटकांच्या पुढचा विचार करायचा असतो आणि स्मिथमध्ये ती क्षमता आहे.

Web Title: captain workload on steve smith