चेन्नई सुपर किंग्जचा चार धावांनी विजय

वृत्तसंस्था
सोमवार, 23 एप्रिल 2018

हैदराबाद - टी २० क्रिकेटमधील अनिश्‍चिततेचा अनुभव घेत चेन्नई सुपर किंग्जने रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबाद संघावर ४ धावांनी विजय मिळविला.

प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर चेन्नईने २० षटकांत ३ बाद १८२ धावा केल्या. त्यानंतर हैदराबादच्या कर्णधार केन विल्यम्सनचे प्रयत्न अपुरे पडले. त्यांचा डाव २० षटकांत ६ बाद १७८ असा मर्यादित राहिला. 

विजयासाठी आव्हान करताना हैदराबाद संघासाठी चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहर कर्दनकाळ ठरला. चहरने चार षटकांत १५ धावांत ३ गडी बाद केले. त्याने एक षटक निर्धाव टाकले. जखमी धवनच्या जागी संधी मिळालेला रिकी भुई आणि मनीष पांडे भोपळा फोडण्यापूर्वीच बाद झाले. त्यानंतर चहरने दीपक हुडाचाही (१) अडथळा सहज दूर केला. एका बाजूने कर्णधार विल्यम्सन खेळत असला, तरी ३ बाद २२ अशा स्थितीतून बाहेर पडताना हैदराबादच्या नाकीनऊ आले. शकिब अल हसन (२४) बाद झाल्यावर चेन्नईने पठाणी हिसका अनुभवला. युसूफने २७  चेंडूंत १ चौकार, ४ षटकारांसह ४५ धावांची खेळी करून हैदराबादला सामन्यात आणले. पण सात धावांच्या अंतरात प्रथम विल्यम्सन आणि नंतर युसूफ बाद झाले. त्यानंतरही ड्‌वेन ब्राव्होन टाकलेल्या अखेरच्या षटकांत १९ धावांची आवश्‍यकता असताना रशिद खाने १४ धावा झोडपल्या. मात्र ब्राव्होने अखेरच्या चेंडूवर रशिदला मोठ्या फटक्‍यापासून वंचित ठेवले आणि ताणल्या गेलेल्या चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

त्यापूर्वी चेन्नईच्या शेन वॉटसन, डु प्लेसिस या नव्या सलामीच्या जोडीला अपयश आले. पण त्यानंतर सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी झालेल्या ११२ धावांच्या भागीदारीने चेन्नईचे आव्हान उभे राहिले. 

चेन्नई २० षटकांत ३ बाद १८२ (रायुडू ७९ -३७ चेंडू, ९ चौकार, ४ षटकार, रैना नाबाद ५४ -४३ चेंडू, ५ चौकार, २ षटकार, धोनी नाबाद २५) वि.वि. हैदराबाद ६ बाद १७८ (विल्यम्सन ८४ -५१ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार, युसूफ ४५ -२७ चेंडू, १ चौकार, ४ षटकार, शकिब २४, रशिद खान नाबाद १७, दीपक चहर ३-१५)

Web Title: Chennai Super Kings won by four runs