पुजारा, रहाणेचे शतक हुकले; भारत 239
कोलकाता : मॅट हेन्रीची भेदक गोलंदाजी आणि चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची संथ, पण भक्कम फलंदाजी यामुळे न्यूझीलंड विरुद्ध भारत या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पारडे जवळपास समान राहिले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताने सात गडी गमावून 239 धावा केल्या होत्या. वृद्धिमान साहा 14, तर रवींद्र जडेजा शून्य धावांवर खेळत आहेत.

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. दुखापतींनी घेरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला आज (शुक्रवार) सामन्यापूर्वी कर्णधार केन विल्यमसनच्या आजारपणाचाही फटका बसला. ताप आल्यामुळे विल्यमसन या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत रॉस टेलरकडे कर्णधारपद सोपविण्यात आले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चांगली सुरवात केली. चाचपडणारा शिखर धवन दुसऱ्याच षटकात बाद झाला. त्यानंतर मुरली विजयही फार काही करू शकला नाही. भरवशाचा विराट कोहलीही केवळ नऊ धावा करून बाद झाला. यामुळे एकवेळ भारताची अवस्था तीन बाद 46 अशी झाली होती.
चेतेश्वर पुजारा आणि रहाणे यांनी खेळपट्टीवर जम बसविण्यावर भर दिला. या प्रयत्नांमध्ये धावगती संथ झाली होती; पण या दोघांनी 141 धावांची भागीदारी करत डाव सावरला. नील वॅग्नरच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन पुजारा बाद झाला. त्यानंतर जीतन पटेलच्या गोलंदाजीवर रहाणेही बाद झाला. ईडन गार्डन्सवर भक्कम कामगिरी करणारा रोहित शर्मा केवळ दोन धावा करून बाद झाला.
के एल राहुलच्या जागी शिखर धवन खेळणार आहे. तसेच, उमेश यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे.
संक्षिप्त धावफलक :
भारत : पहिला डाव : 86 षटकांत 7 बाद 239
शिखर धवन 1
मुरली विजय 9
चेतेश्वर पुजारा 87
विराट कोहली 9
अजिंक्य रहाणे 77
रोहित शर्मा 2
आर. आश्विन 26
वृद्धिमान साहा खेळत आहे 14
रवींद्र जडेजा खेळत आहे 0
अवांतर : 14
गोलंदाजी :
ट्रेंट बोल्ट 1-33
मॅट हेन्री 3-35
नील वॅग्नर 1-37
मिशेल सॅंटनर 0-54
जीतन पटेल 2-66