आमचे लक्ष सामन्यावर : विराट

शनिवार, 3 जून 2017

हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून असल्याने चारच गोलंदाज खेळणार. तीन वेगवान आणि एक फिरकी गोलंदाज आम्ही खेळवू असे वाटते

''प्रसारमाध्यमांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर काय चर्चा चालू आहे, याकडे माझे अजिबात लक्ष नाही. चॅंम्पियन्स स्पर्धा सुरू होत असताना आमचे लक्ष सामन्यावर केंद्रित झाले आहे. जे लोक संघाचा किंवा संघ व्यवस्थापनाचा भाग नाहीत, त्यांच्या अंदाजांना मी महत्त्व देत नाही. पाक संघात मोठी नावे कमी असली, तरी त्यांच्या खेळाच्या कौशल्याला आम्ही कमी लेखणार नाही. तो असा संघ आहे जो कोणालाही चकीत करू शकतो. आम्हाला आमच्या बलस्थानांचा विचार करून योजना आखायच्या आहेत,'' अशा शब्दांत विराट कोहलीने भावना व्यक्त केल्या. 

''हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून असल्याने चारच गोलंदाज खेळणार. तीन वेगवान आणि एक फिरकी गोलंदाज आम्ही खेळवू असे वाटते,'' असे तो म्हणाला. यामुळे अश्‍विनला वगळले जाण्याची शक्‍यता आहे. 

पाकविरुद्धच्या खेळण्याबद्दल तो म्हणाला, ''सामना कोणताही असो माझी एकाग्रता आणि सर्वोत्तम खेळ करून सामना जिंकायची इच्छाशक्ती तशीच असते. पाकिस्तानसमोर खेळताना चाहत्यांच्या भावना तीव्र होतात. खेळाडूंना भावनांवर नियंत्रण ठेवून चांगला खेळ करावा लागतो. चांगले सर्वांगीण क्रिकेट खेळणे हाच स्पर्धेत मुसंडी मारण्याचा राजमार्ग आहे.''