पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका 'बॅकफूट'वर

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

पर्थ : मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दिलेल्या दणक्‍यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिका 'बॅकफूट'वर गेली आहे. पहिल्या दिवशी 64 षटकांमध्येच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 242 धावांत आटोपला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता 105 धावा केल्या. खेळ थांबला, तेव्हा वॉर्नर 73, तर शॉन मार्श 29 धावांवर खेळत होते.

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मोसमाची सुरवातच दणक्‍यात झाली. कसोटीच्या पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कने सलामीवीर स्टीफन कूकला बाद केले. त्यानंतर भरवशाचा हाशिम आमलाही शून्यावरच बाद झाला. दुसरीकडे चाचपडत खेळणारा सलामीवीर डीन एल्गरही आठव्या षटकात बाद झाला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची अवस्था तीन बाद 20 अशी झाली होती. कर्णधार फाफ डू प्लेसिस (37), टेम्बा बावुमा (51) आणि क्विंटन डिकॉक (84) यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. स्टार्कने चार, तर हेझलवूडने तीन गडी बाद केले.

चार वर्षांपूर्वी याच 'वॅका'च्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 225 धावांत संपुष्टात आला होता. पण तरीही ती कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकली होती. पण या कसोटीमध्ये वॉर्नरने नेहमीप्रमाणेच आक्रमक सुरवात करत दक्षिण आफ्रिकेला 'बॅकफूट'वर ढकलले. या आक्रमक खेळीमुळे मोसमाची सुरवात विजयी करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. आता ऑस्ट्रेलिया 137 धावांनी पिछाडीवर आहे.

संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका : पहिला डाव : 63.4 षटकांत सर्वबाद 242
क्विंटन डिकॉक 84, टेम्बा बावुमा 51, फाफ डू प्लेसिस 37
मिचेल स्टार्ल 4-71, जोश हेझलवूड 3-70, नॅथन लिओन 2-38, पीटर सिडल 1-36
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : 21 षटकांत बिनबाद 105
डेव्हिड वॉर्नर खेळत आहे 73, शॉन मार्श खेळत आहे 29

Web Title: David Warner and Mitchell Stark put South Africa on back foot on first day