एबी डिव्हिलर्स कसोटीतून निवृत्ती घेण्याच्या विचारात 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

कसोटीमधून निवृत्ती घेण्याचा विचार डिव्हिलर्सने गेल्याच वर्षी बोलून दाखविला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने त्याचे मन वळवून त्याला परावृत्त केले. निवृत्ती घेण्याऐवजी एक वर्ष कसोटी न खेळण्याचा पर्याय त्याच्यासमोर ठेवण्यात आला होता आणि त्यानेही तो मान्य केला होता.

जोहान्सबर्ग : 'क्रिकेटविश्‍वातील सर्वांत प्रभावी खेळाडूंपैकी एक' अशी गणना होत असलेला दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलर्स येत्या ऑगस्टमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात असल्याचे वृत्त 'क्रिकइन्फो'ने प्रसिद्ध केले आहे. यासंदर्भात डिव्हिलर्स दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाशी चर्चा करणार आहे. 

कसोटीमधून निवृत्ती घेण्याचा विचार डिव्हिलर्सने गेल्याच वर्षी बोलून दाखविला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने त्याचे मन वळवून त्याला परावृत्त केले. निवृत्ती घेण्याऐवजी एक वर्ष कसोटी न खेळण्याचा पर्याय त्याच्यासमोर ठेवण्यात आला होता आणि त्यानेही तो मान्य केला होता. सेंच्युरियनमध्ये 2016 च्या जानेवारीत इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर डिव्हिलर्स कसोटी क्रिकेटपासून दूरच राहिला. 

ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांची निवड होण्यापूर्वी क्रिकेट मंडळाशी डिव्हिलर्स चर्चा करणार आहे. याच बैठकीमध्ये तो कसोटीतून निवृत्तीविषयीही चर्चा करेल, असे 'क्रिकइन्फो'ने म्हटले आहे. कसोटीमधून निवृत्ती घेतली, तरीही 2019 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्याचा डिव्हिलर्सचा मानस आहे. यासंदर्भात दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. 

'कसोटीतून निवृत्ती घेत विश्‍वकरंडक स्पर्धेवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा विचार डिव्हिलर्स करत आहे. हल्लीच्या क्रिकेटमधील धावपळीचे वेळापत्रक, सततचे दौरे यांचा परिणाम शरीरावर होत असतोच. याला डिव्हिलर्सही अपवाद नाही', असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांनी 'द इंडिपेंडंट'मध्ये लिहिलेल्या स्तंभात व्यक्त केले होते. 'कर्णधारपद सोडून दे आणि विश्‍वकरंडक स्पर्धेवर लक्ष दे' असा सल्लाही स्मिथ यांनी डिव्हिलर्सला दिला होता. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
मला 17 राजकीय पक्षांचा पाठिंबा - मीरा कुमार​
अन् मोदींच्या पत्नीसाठी गार्डने उघडला कारचा दरवाजा​
कट्टर मुस्लिम दहशतवाद संपवून टाकू; मोदी-ट्रम्प यांचे संयुक्त निवेदन​
"काश्‍मिरी बांधवां'चे रक्त सांडणाऱ्या भारतीयांना धडा शिकवू: अल कायदा​
पुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ​
माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू
सलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​
सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​
मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​
शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​