निराश झालो, पण हरलेलो नाही - गंभीर

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - दुलीप करंडकात धावांचा पाऊस पाडणारा भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर याने न्यूझीडंलविरुद्धच्या मालिकेसाठी निवड न झाल्याने निराश झालो, पण हरलेलो नसल्याचे म्हटले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. भारतीय संघात कोणताही बदल न करता रोहित शर्मा व शिखर धवन यांना संघात कायम ठेवण्यात आले. दुलीप करंडकात धावांचा पाऊस पाडणाऱ्या गंभीरची निवड न झाल्याने त्याने नाराजी दर्शविली आहे. गंभीर हा गेल्या काही वर्षांपासून संघाबाहेर आहे. गंभीरला यावेळी संधी मिळण्याची अपेक्षा होती. पण, त्याची निवड करण्यात आलेली नाही.

गंभीर म्हणाला की, मी निराश आहे, पण पराभव मानणाऱ्यांतला नाही. माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. पण, मी घाबरणारा नाही. मैदान हेच माझे सोबती असून, धाडस हाच माझा गर्व आहे. त्यामुळे मी लढणार आणि लढतच राहणार.