भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७) अजित वाडेकर यांचे आज (बुधवार) कर्करोगाने निधन झाले. त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

१९६६ ते १९७४ या कालावधीत वाडेकर यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. 'वन डाऊन' फलंदाजी करणारे वाडेकर भारताच्या सर्वोत्तम स्लीप फिल्डर्सपैकी एक होते.

वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळविले. परदेशात कसोटी मालिका जिंकणारे वाडेकर हे पहिलेच भारतीय कर्णधार ठरले. याशिवाय, भारताच्या पहिल्या 'वनडे' संघाचेही ते सदस्य होते.

 त्यांना १९६७ मध्ये 'अर्जुन', तर १९७२ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. निवृत्तीनंतर १९९० च्या दशकात वाडेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले होते. 

कसोटी संघाचे सदस्य, कर्णधार, व्यवस्थापक आणि निवड समितीचे अध्यक्षपद अशी सर्व ठिकाणी कामगिरी केलेल्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये वाडेकर यांचा समावेश होतो. वाडेकर यांच्याशिवाय लाला अमरनाथ आणि चंदू बोर्डे यांनीच अशी कामगिरी केली आहे.

Web Title: Former India captain Ajit Wadekar passes away