मॅक्‍सवेलचा धडाका; ऑस्ट्रेलियाचा विक्रम

पीटीआय
गुरुवार, 8 सप्टेंबर 2016

पल्लिकल - धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्‍सवेलच्या (नाबाद १४५) स्फोटक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध टी २० क्रिकेटमधील विक्रमी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ३ बाद २६३ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेचा डाव ९ बाद १७८ असा रोखत त्यांनी ८५ धावांनी विजय मिळविला.

टी २० क्रिकेटमध्ये यापूर्वी ६ बाद २६० ही विक्रमी धावसंख्या श्रीलंकेच्या नावावर होती. त्यांनी २००७ मध्ये जोहान्सबर्ग येथे केनियाविरुद्ध ही धावसंख्या नोंदवली होती.

मॅक्‍सवेलला सलामीला खेळविण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय चांगलाच फळाला आला. त्याने ६५ चेंडूंत १४ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद १४५ धावांची खेळी केली. एरवी आक्रमक खेळणारे वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा लवकर बाद झाल्यावर ट्राविस हेडने देखील शेवटी श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने १८ चेंडूंत ४ चौकार, ३ षटकारांसह ४५ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. या जोडीने अवघ्या २८ चेंडूत १०९ धावांची भागीदारी केली. 

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरवात कुचकामी ठरली. मधल्या फळीत दिनेश चंडिलम (५८), चामरा कापुगेदरा (४३) यांनी धडपड केली. पण, ऑस्ट्रेलियाचे आव्हान त्यांच्या आवाक्‍याबाहेरच राहिले. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क आणि स्कॉट बोलॅंड यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया ३ बाद २६३ (ग्लेन मॅक्‍सवेल नाबाद १४५, ट्राविस हेड ४५)  वि.वि. श्रीलंका ९ बाद १७८ (दिनेश चंडिमल ५८, चामरा कापुगेदरा ४३, स्टार्क ३-२६, बोलॅंड ३-२६)