आयपीएल: पंजाबच्या कर्णधारपदी ग्लेन मॅक्‍सवेल 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

नवी दिल्ली : 'इंडियन प्रीमिअर लीग'च्या (आयपीएल) आगामी दहाव्या मोसमासाठी 'किंग्ज इलेव्हन पंजाब' संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्‍सवेलकडे सोपविण्यात आले आहे. गेल्या मोसमात पंजाबच्या संघाने डेव्हिड मिलरकडे नेतृत्व सोपविले होते. सहा सामन्यांनंतर मिलरला वगळून मुरली विजयला कर्णधारपदी नियुक्त केले होते. यंदा पाच एप्रिलपासून 'आयपीएल' सुरू होत आहे. 

दोन कर्णधार बदलूनही गेल्या मोसमात पंजाबच्या संघाला यश आले नव्हते. सलग दोन स्पर्धांमध्ये पंजाब शेवटच्या स्थानी राहिले. त्यामुळे यंदा पंजाबने संघात आमूलाग्र बदल करण्याचे ठरविले आहे. वास्तविक पंजाबच्या संघात इऑन मॉर्गन आणि डॅरेन सॅमीसारखे आंतरराष्ट्रीय संघांचे अनुभवी कर्णधार आहेत; तरीही त्यांनी मॅक्‍सवेलकडे नेतृत्व सोपविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत मॅक्‍सवेलने कधीही कुठल्याही संघाचे नेतृत्व केलेले नाही. 

नव्या कर्णधाराबरोबरच पंजाब संघाने घरच्या सामन्यांसाठी आणखी एक मैदानही निवडले आहे. मोहाली हे पंजाबचे 'होम ग्राऊंड' आहे. त्याच्या जोडीला आता यंदाच्या मोसमातील पंजाबचे तीन सामने इंदूरमधील होळकर स्टेडियमवर होणार आहेत. 

किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ : 
वरुण ऍरॉन, हाशिम आमला, अनुरित सिंग, अरमान जाफर, के. सी. करिअप्पा, मार्टिन गुप्टील, गुरकीरतसिंग मान, मॅट हेन्री, शॉन मार्श, ग्लेन मॅक्‍सवेल (कर्णधार), डेव्हिड मिलर, इऑन मॉर्गन, निखिल नाईक, टी. नटराजन, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), प्रदीप साहू, डॅरेन सॅमी, संदीप शर्मा, मोहित शर्मा, रिंकू सिंग, मार्कस स्टॉईनिस, स्वप्निल सिंग, राहुल तेवाटिया, शार्दूल ठाकूर, मुरली विजय, मनन व्होरा. 

Web Title: Glenn Maxwell to captain Kings Eleven Punjab in IPL