गुरु ग्रेगने केले अनिल कुंबळेचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

सिडनी - भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली नशीबवान आहे की त्याला संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेसारखा खेळाडू मिळाला आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी म्हटले आहे.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची नुकतीच निवड झाली आहे. भारतीय संघ कुंबळेच्या प्रशिक्षणाखाली वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार असून, भारतीय संघाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे आहे. कुंबळेचे कौतुक करताना ग्रेग चॅपेल यांनी विराटला नशीबवान ठरविले आहे.

चॅपेल म्हणाले की, कुंबळे आणि कोहली हे प्रशिक्षक आणि कर्णधारपदाची भूमिका चोख बजावून, त्यांच्यापुढील आव्हाने पूर्ण करतील. या दोघांचा भारतीय क्रिकेटमधील नव्या खेळाडूंना नक्कीच फायदा होईल. हे दोघेही भारतीय क्रिकेट पुढे नेतील. कुंबळे हा शंभरटक्क्यांपेक्षा अधिक योगदान देऊन भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आग्रही असेल. 

क्रीडा

नवी दिल्ली - सध्या स्वप्नवत "फॉर्म'मध्ये असलेल्या भारतीय बॅडमिंटनपटू किदंबी...

शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई - अमेरिकेविरुद्ध सफाईदार विजय संपादलेल्या भारतीय पुरुष संघास जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत दुबळ्या इजिप्तविरुद्ध निसटत्या...

शुक्रवार, 23 जून 2017

पुणे - खेड शिवापूर येथील उदयोन्मुख रायडर युवराजसिंह कोंडे देशमुख याने आशियाई मोटोक्रॉस मालिकेतील दुसऱ्या फेरीत दुसरा क्रमांक...

शुक्रवार, 23 जून 2017