आघाडीनंतर गुजरातची सामन्यावर घट्ट पकड

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

जयपूर : एक वेळच्या 6 बाद 71 अशा कठीण स्थितीतून बाहेर पडलेल्या गुजरातने तिसऱ्या दिवसअखेरीस ओडिशाविरुद्ध 310 धावांची आघाडी मिळवून सामन्यावरील आपली पकड घट्ट केली.

जयपूर : एक वेळच्या 6 बाद 71 अशा कठीण स्थितीतून बाहेर पडलेल्या गुजरातने तिसऱ्या दिवसअखेरीस ओडिशाविरुद्ध 310 धावांची आघाडी मिळवून सामन्यावरील आपली पकड घट्ट केली.

जसप्रीत बुमराच्या भेदक गोलंदाजीमुळे तिसऱ्या दिवशी रविवारी ओडिशाचा पहिला डाव झटपट गुंडाळण्यात गुजरातला यश आले. बुमराने 41 धावांत 5 गडी बाद केले. ओडिशाचा पहिला डाव 199 धावांत आटोपला. पहिल्या डावात 64 धावांची आघाडी मिळविल्यानंतर गुजरातने दुसऱ्या डावात 3 बाद 246 धावा करून आपली बाजू भक्कम केली. दुसऱ्या डावात प्रियांक पांचाळ आणि समीत गोहेल यांनी 149 धावांची सलामी दिली.

यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा पांचाळ (81) शतकापासून वंचित राहिला; पण समीतने कारकिर्दीमधील तिसरे शतक साजरे केले. त्याने भार्गव मेराईच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 49 आणि रुजुल भटच्या तिसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा समीत कारकिर्दीमधील सर्वोत्तम 110 धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक :
गुजरात 263 आणि 3 बाद 246 (समीत गोहेल खेळत आहे 110, प्रियांत पांचाळ 81) वि. ओडिशा 199 (सूर्यकांत प्रधान 47, दीपक बेहरा 41, जसप्रीत बुमरा 5-41, रुष कलारिया 2-42, हार्दिक पटेल 2-47)

क्रीडा

मुंबई - विश्‍वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव यांच्यातील दोन दशकांपूर्वीच्या जागतिक विजेतेपदाच्या लढतीच्या आठवणींना उजाळा देणारी...

10.24 AM

न्यूयॉर्क - आगामी अमेरिकन ओपन या मोसमातील अखेरच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेसाठी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवा हिला ‘वाईल्ड कार्ड’...

10.24 AM

लंडन - न्यूझीलंडची कर्णधार सूझी बेटस्‌ हिने किआ सुपर लीग टी-२० स्पर्धेत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. तिने अवघ्या ६३ चेंडूंत...

10.09 AM