हर्षा भोगले पुनरागमन करणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

नवी दिल्ली - क्रिकेट समालोचक म्हणून हर्षा भोगले यांचे यंदाच्या "आयपीएल' स्पर्धेतून पुनरागमन होण्याची शक्‍यता वाढली आहे. अर्थात, ते मैदानावरून समालोचन करणार नाहीत. तज्ज्ञ म्हणून स्टुडियोत बसून ते सामन्याबाबत चर्चा करणार आहेत. "बीसीसीआय'मध्ये भोगले यांना विरोध करणारे कुणी राहिलेले नाहीत. त्याचबरोबर पाकिस्तानबरोबरच्या नाजूक संबंधांमुळे रमीझ राजा, वकार युनूस, शोएब अख्तर येऊ शकणार नाहीत. त्यामुळे भोगले यांच्या नावाला पसंती मिळत आहे. अर्थात, याबाबत अजून भोगले यांनी कुठलेही वक्तव्य केलेले नाही.