भारताच्या केवळ स्मृती मानधनाचा समावेश

पीटीआय
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या महिलांच्या वार्षिक टी 20 संघात भारताच्या केवळ स्मृती मानधना हिलाच स्थान मिळाले आहे. महिलांच्या या संघाच्या कर्णधारपदी वेस्ट इंडीजच्या स्टेफानी टेलर हिची निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंडची सूझी बेट्‌स एकदिवसीय आणि टी 20 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरली आहे.

संघात स्थान देताना आणि वार्षिक पुरस्कारासाठी निवड करताना सप्टेंबर 2014 ते सप्टेंबर 2015 या वर्षातील खेळाडूंची कामगिरी लक्षात घेण्यात आली आहे. या कालावधीत महिला टी-20 विश्‍वकरंडक आणि आयसीसी महिला अजिंक्‍यपद स्पर्धेचा समावेश आहे.

यापूर्वी सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू ठरलेल्या सुझीला या वेळी टी-20मधील सर्वोत्तम खेळाडू ठरविण्यात आले. एकाच वर्षांत एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडू ठरणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली.

या मोसमात बेट्‌स हिने 8 एकदिवसीय सामन्यात 94च्या सरासरीने तिने 472 धावा केल्या. त्याचबरोबर 22.50च्या सरासरीने तिने 8 गडीही बाद केले. टी 20 क्रिकेटमध्ये तिने 42.90च्या सरासरीने 429 धावा केल्या. तिच्याच नेतृत्त्वाखाली न्यूझीलंडने एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. टी 20 विश्‍वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरी देखील गाठली.

पुरस्कारार्थींची निवड क्‍लेअर कॉनर, मेल जोन्स आणि शुभांगी कुलकर्णी यांच्या निवड समितने केली.

वार्षिक संघ ः सुझी बेट्‌स, रशेल प्रिस्ट (यष्टिरक्षक), स्मृती मानधना, स्टेफानी टेलर (कर्णधार), मेग लॅनिंग, एलिसे पेरी, हिदर नाईट, डिआंड्रा डॉटिन, सुन लुस, अनया श्रुबसोल, लिघ कास्पेरेक

आयसीसीच्या वतीने प्रथमच महिला संघ निवडण्यात येत आहे. गुणवत्ता आणि कौशल्य या आघाडीवर दरवर्षी महिला क्रिकेटमध्ये प्रगतीच होत आहे. वर्षभरात अनेक चांगल्या कामगिरी समोर आल्या आहेत. त्यामुळे पुरस्कार्थींची नावे निश्‍चित करण्यासाठी पुरस्कार समिती सदस्यांना कठोर मेहनत घ्यावी लागेल यात शंका नाही.
-डेव्ह रिचर्डसन, आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी