आयसीसीचा पुन्हा बीसीसीआयला ठेंगा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यातील दुराव्याचे पडसाद क्रिकेटमधील या दोन्ही संघटनांच्या संबंधांवर पडताना दिसत आहेत. आयसीसीने कार्यकारी गटाच्या बैठकीपासून बीसीसीआयला दूर ठेवले आहे. असा प्रकार सलग दुसऱ्यांदा घडला आहे. 

मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यातील दुराव्याचे पडसाद क्रिकेटमधील या दोन्ही संघटनांच्या संबंधांवर पडताना दिसत आहेत. आयसीसीने कार्यकारी गटाच्या बैठकीपासून बीसीसीआयला दूर ठेवले आहे. असा प्रकार सलग दुसऱ्यांदा घडला आहे. 
सप्टेंबर महिन्यात सिंगापूरमध्ये या अगोदर झालेल्या कार्यकारी गटाच्या बैठकीसाठीही आम्हाला निमंत्रित करण्यात आले नव्हते. आता ॲडलेडमध्ये होणाऱ्या बैठकीसाठीही आम्हाला बोलवण्यात आलेले नाही, असे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे. ॲडलेडमधील बैठकीसाठी आम्हाला उपस्थित राहायचे आहे, असे पत्र बीसीसीआयने आयसीसीला लिहिले असल्याचे समजते. आयसीसी कार्यकारी गटाची नियुक्ती करते, त्यामुळे तुम्हाला निमंत्रित करण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही, असे उत्तर आयसीसीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आयसीसीकडून आम्हाला बैठकीपासून डावलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असल्याचा आरोप आयसीसीकडून करण्यात येत आहे. आयसीसीकडून नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकारी गटाची समिती आयसीसीच्या पुढील प्रशासकीय रचना तयार करण्यासह महसूल विभागणी मॉडेल तयार करणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ॲडलेडमध्ये होणाऱ्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यादरम्यान ही बैठक होणार आहे.

कार्यकारी समितीमध्ये शशांक मनोहर (अध्यक्ष), गाईल्स क्‍लार्क (इंग्लंड), डेव्हिड पीवर (क्रिकेट ऑस्ट्रेलिया), नझमुल हसन (बांगलादेश) आणि इम्रान ख्वाजा (सिंगापूर) यांचा समावेश आहे. शशांक मनोहर आयसीसीचे स्वतंत्र कारभार असलेले अध्यक्ष झाले. त्यानंतर कार्यकारी समितीच्या तीन बैठका झाल्या आहेत. त्यातील दोन बैठकांमध्ये (मुंबई, एप्रिल २०१६) आणि (दुबई ऑगस्ट २०१६) अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआयचे प्रतिनिधित्व केले होते.

आयसीसीच्या उत्पन्नांचा सर्वाधिक वाटा आयसीसीला निधी मिळवून देणाऱ्या ‘बिग थ्री’ देशांना मिळायला हवा आणि उर्वरित महसूल इतर देशांना विभागून देण्यात येण्याची रचना एन. श्रीनिवासन आयसीसीचे अध्यक्ष असताना त्यांनी तयार केली होती; परंतु शशांत मनोहर आयसीसीचे पहिले स्वतंत्र अध्यक्ष झाल्यावर त्यांनी ही रचना बदलली आणि सर्व देशांना समान निधी वाटपाचे सूत्र तयार केले.

क्रीडा

श्रीपेरंबुदूर - मुंबईच्या सौरव बंदोपाध्याय याने राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमीओ करंडक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील पहिली शर्यत...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

लखनौ - नऊ सामन्यांत अवघा एकच विजय मिळवल्यामुळे प्रो- कबड्डीच्या पाचव्या मोसमात हेलकावे खात असलेल्या तेलुगू टायटन्सला यू मुम्बाने...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

आव्हान देण्याचीही श्रीलंका संघाची मानसिक तयारी नाही दाम्बुला - कसोटी मालिकेतील धवल यशानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित...

रविवार, 20 ऑगस्ट 2017