आफ्रिकेच्या कर्णधारावर चेंडू कुरतडल्याचा आरोप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

विशेष म्हणजे, 'फाफ डू प्लेसिसने चेंडू कुरतडला' यासंदर्भात पंच किंवा सामनाधिकाऱ्यांनी कुठलाही अहवाल किंवा तक्रार दाखल केलेली नाही. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्धीमाध्यमांनी याविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यानंतर 'आयसीसी'ने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

होबार्ट : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसवर चेंडू कुरतडल्याचा आरोप केल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. होबार्टमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात डू प्लेसिस चेंडू कुरतडत असल्याचा पुरावा मिळाल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) म्हटले आहे. या प्रकरणी 'आयसीसी'ने डू प्लेसिसवर दोषारोपपत्र दाखल केले आहे.

फाफ डू प्लेसिसने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत हे आरोप नाकारले आहेत. या प्रकरणी कायदेशीर मदत घेण्याचाही विचार असल्याचे त्याने सांगितले. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे; मात्र त्याची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नाही. या प्रकरणी दोषी आढळल्यास फाफ डू प्लेसिसवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते. मंगळवारच्या खेळादरम्यान डू प्लेसिसने चेंडूवर थुंकीसह तोंडातील च्युईंगगमही लावल्याचा व्हिडिओ समोर आल्याचे 'आयसीसी'ने म्हटले आहे.

'फाफ डू प्लेसिसवरील हे आरोप हास्यास्पद आणि मूर्खपणाचे आहेत. आमच्या कर्णधाराने काहीही चुकीचे केलेले नाही,' अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेच्या संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली. या प्रकरणी आज (शुक्रवार) दक्षिण आफ्रिकेचा वरिष्ठ फलंदाज हाशिम आमलासह सर्व खेळाडू आणि इतर सहाय्यकांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस डू प्लेसिसही उपस्थित होता; मात्र त्याने कोणत्याही प्रश्‍नांना उत्तर दिले नाही.

आमला म्हणाला, "फाफ डू प्लेसिसवरील हे आरोप मूर्खपणाचे आहेत. आम्ही सर्व त्याच्या पाठीशी आहोत. मैदानावर असताना बहुतांश खेळाडू काही ना काही खात असतात. मी स्वत: क्षेत्ररक्षण करताना बबलगम खात असतो. मग चेंडूला चमकाविण्यासाठी बोट ओले करण्याआधी दरवेळी मी दात घासून आले पाहिजे का? अशा बाबतींमध्ये 'कॉमन सेन्स' वापरला पाहिजे. एखाद्या गोड पदार्थामुळे चेंडूची चमक वाढते, हे आताच कळतंय..''

क्रीडा

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीतून अद्याप पूर्ण तंदुरुस्त झाला नसल्याने आगामी भारत...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

दिल्लीचा विजय, तर गुजरातची बरोबरी अहमदाबाद - घरच्या मैदानावर गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सला आपली विजयी मालिका अखेरच्या दिवशी कायम...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमे विराट कोहलीबद्दल सतत टीका करत असली, तरी माझ्यासह त्याचे ऑस्ट्रेलियात असंख्य चाहते असल्याचे...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017