पुणे जिंका; दहा लाख डॉलर मिळवा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पुण्यातील पहिली कसोटी जिंकली तर आयसीसीचे कसोटीत अव्वल क्रमांक राखल्याचे दहा लाख डॉलरचे बक्षीस विराट सेनेला जिंकता येईल. 

कसोटी क्रमवारीत 1 एप्रिलला अव्वल असलेल्या संघास अव्वल क्रमांकाचे दहा लाख डॉलरचे बक्षीस देण्यात येते. भारत सध्या कसोटी क्रमवारीत आघाडीवर आहे. भारताचे 121 मानांकन गुण आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाचे 109 आणि तिसऱ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेचे 107 मानांकन गुण आहेत. 

ऑस्ट्रेलियासही अव्वल क्रमांकाची संधी आहे, मात्र त्यासाठी त्यांना या मालिकेत 3-0 असा विजय आवश्‍यक आहे. भारताची मायदेशातील कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियाच्या यशाची शक्‍यता धूसरच आहे. भारतीय संघ गेल्या 19 कसोटींत अपराजित आहे. भारताने मायदेशात गेल्या वीस कसोटींत हार पत्करलेली नाही. 

कांगारू दुसरे असले तरी, त्यांची कामगिरी खालावली आहे. भारतीय उपखंडात तर ऑस्ट्रेलियास यश दुरावतच आहे. काही महिन्यांपूर्वी स्टीव स्मिथचा संघ श्रीलंकेत 0-3 पराजित झाला होता. त्यानंतर ते मायदेशात आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराजित झाले होते.