लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 109 धावा

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मार्च 2017

संघातील बदल
तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात एकच बदल करण्यात आला. दुखापतीतून बऱ्या झालेल्या मुरली विजयला संघात स्थान मिळाले. त्यासाठी अभिनव मुकुंदला बाहेर बसावे लागले. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघात दोन बदल करण्यात आले आहेत. स्टार्क जखमी झाल्याने पॅट कमिन्सला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, ग्लेन मॅक्‍सवेलला संधी देण्यात आली आहे.

रांची - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट दंद्वाला आज (गुरुवार) आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरवात झाली असून, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. लंचला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 109 धावा झाल्या होत्या. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी क्रिकेट सामना रांचीत होत आहे. रांची कसोटी केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत आहे. भारतामधील हे 26वे केंद्र ठरेल. दोन कसोटी सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. खेळपट्टीचे सध्याचे स्वरूप लक्षात घेता नाणेफेकीचा कौल आणि पर्यायाने पहिल्या डावातील खेळ महत्त्वपूर्ण होता. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. 

वॉर्नर आणि रेन्शॉ या ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविला. अखेर फिरकीपटूनेच भारताला पहिले यश मिळवून दिले. जडेजाने 19 धावांवर स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेऊन बाद केले. रेन्शॉ आणि कर्णधार स्मिथने धावसंख्या वाढविण्यास सुरवात केली. मात्र, रेन्शॉ 44 धावांवर उमेश यादवचा शिकार ठरला. त्यानंतर शॉन मार्शही कमाल दाखवू शकला नाही. त्याला आश्विनने 2 धावांवर बाद केले. लंचपर्यंत स्मिथ आणि हँडस्कॉम्ब यांनी भारतीय गोलंदाजांना सामना करत संघाची धावसंख्या शतकाच्या पार नेली.

संघातील बदल
तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात एकच बदल करण्यात आला. दुखापतीतून बऱ्या झालेल्या मुरली विजयला संघात स्थान मिळाले. त्यासाठी अभिनव मुकुंदला बाहेर बसावे लागले. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघात दोन बदल करण्यात आले आहेत. स्टार्क जखमी झाल्याने पॅट कमिन्सला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, ग्लेन मॅक्‍सवेलला संधी देण्यात आली आहे.

Web Title: India vs Australia, 3rd Test, Australia 109/3, 1 wicket apiece for Jadeja, Umesh and Ashwin.