कोहलीला डिवचण्याची 'रिस्क' घेणार नाही- मॅक्सवेल

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मी विराटविरोधात काहीही बोलणार नाही. माझ्याकडून हे निश्चित आहे. माझ्यामते विराटला स्लेजिंग कमी जास्त प्रमाणात आवडते.

मुंबई - भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत विराट कोहलीविरुद्ध स्लेजिंग करण्याची जोखीम मी घेणार नसल्याचे, ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने म्हटले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका 23 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्यापूर्वीच या दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्धाला सुरवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने भारताविरुद्धच्या मालिकेत स्लेजिंग करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित झाले होते. पण, मॅक्सवेलने कोहलीविरोधात स्लेजिंगची जोखीम न घेण्याचे ठरविले आहे.

मॅक्सवेल म्हणाला की, मी विराटविरोधात काहीही बोलणार नाही. माझ्याकडून हे निश्चित आहे. माझ्यामते विराटला स्लेजिंग कमी जास्त प्रमाणात आवडते. स्टिव्ह स्मिथने पत्रकार परिषदेत सांगितले ते योग्यच होते. मैदानावर चांगली कामगिरी न झाल्याने शाब्दिक खेळ करणे योग्यच आहे.