इंग्रजांवर भारताचा धडाकेबाज विजय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

पुणे- विराट कोहली आणि केदार जाधवच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्रजांच्या 351 धावांच्या बलाढ्य आव्हानाला भारतीय खेळाडूंनी सडेतोड उत्तर देत 3 गडी आणि 11 चेंडू राखून जबरदस्त विजय मिळविला. 

भारताच्या 48 षटकांत 350 धावा. एक धाव आवश्यक होती. हार्दिक पंड्याने षटकार ठोकून 350 धावांटा टप्पा गाठला आणि पुन्हा षटकारच ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.
आवश्यक गतीने धावा होत असतानाच भारताचे गडीदेखील एकामागून एक बाद होत गेल्याने शेवटपर्यंत काय होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. 
 47 षटकांनंतर 7 बाद 339 अशी स्थिती होती.  हार्दिक पंड्या आणि अश्विननेही सावध खेळी करीत आशा कायम राखल्या.

पुणे- विराट कोहली आणि केदार जाधवच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्रजांच्या 351 धावांच्या बलाढ्य आव्हानाला भारतीय खेळाडूंनी सडेतोड उत्तर देत 3 गडी आणि 11 चेंडू राखून जबरदस्त विजय मिळविला. 

भारताच्या 48 षटकांत 350 धावा. एक धाव आवश्यक होती. हार्दिक पंड्याने षटकार ठोकून 350 धावांटा टप्पा गाठला आणि पुन्हा षटकारच ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.
आवश्यक गतीने धावा होत असतानाच भारताचे गडीदेखील एकामागून एक बाद होत गेल्याने शेवटपर्यंत काय होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. 
 47 षटकांनंतर 7 बाद 339 अशी स्थिती होती.  हार्दिक पंड्या आणि अश्विननेही सावध खेळी करीत आशा कायम राखल्या.

सलामीच्या फलंदाजांच्या विकेट पडल्यानंतर काहीशी डळमळीत झालेली अवस्था सावरत विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीला अस्सल मराठी तडका देत पुण्याच्या केदार जाधवने शतक ठोकून महत्त्वपूर्ण साथ दिली. 
केदारने आपल्या होम ग्राऊंडवर केलेल्या खेळीला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद देत गहुंजे स्टेडियम अक्षरशः डोक्यावर घेतले. 

तत्पूर्वी, जेसन रॉय आणि ज्यो रुट यांच्या संयमानंतर बेन स्टोक्‍सच्या स्ट्रोकफूल खेळीने इंग्लंडच्या आव्हानाला मजबुती आली. तिघांची अर्धशतकी खेळी हे त्यांच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. यातही स्टोक्‍सचे अर्धशतक हे भारताविरुद्धचे इंग्लंडकडून झळकावलेले गेलेले वेगवान ठरले. त्याने 33 चेंडूंत अर्धशतकी खेळी केली. यापूर्वी ओएस शाह आणि ऍण्ड्रयू फ्लिंटॉफ यांनी 35 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. धावांचा वेग कसा वाढवायचा, हे ठरवून नियोजनबद्ध केलेल्या फलंदाजीमुळेच इंग्लंडचा डाव आकाराला आला. 

नाणेफेक हरल्यावर प्रथम फलंदाजी मिळाल्यावर जेसन रॉय आणि ऍलेक्‍स हेल्स यांनी इंग्लंडच्या मोठ्या धावसंख्येचा मार्ग आखला होता. हेल्स अडखळत खेळला, पण त्याची भरपाई रॉयने धावफलक हलता ठेवून केली. षटकामागे चार धावा घ्यायच्या आणि मग अधिक धावांचा प्रयत्न करायचा, अशा सोप्या नियोजनाने इंग्लंडच्या आघाडीच्या फळीने फलंदाजी केली. त्यामुळेच हेल्स असो किंवा नंतर रॉय यांच्या विकेट पडल्यानंतरही त्यांच्या धावगतीवर परिणाम झाला नाही. रॉयने आखलेल्या मार्गावर रुटने इंग्लंडचा डाव रुळावर राहील याची काळजी घेतली. रॉय आणि रुट यांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावा केल्या. 
कसोटीत ज्या फिरकीने इंग्लंडला त्रस्त केले. त्याच फिरकीवर इंग्लंडच्या रॉय, रुटने हल्ला केला. त्यांच्या फलंदाजीत आक्रमकता नसली, तरी एकेरी, दुहेरी धावांमुळे वेग जरूर होता. फिरकीच्या आठ षटकांनंतर जडेजाने रॉयला चकवले. पण, नंतर रुटने प्रथम कर्णधार इयॉन मॉर्गन आणि नंतर जोस बटलरच्या साथीत भारतीय गोलंदाजांना निराश केले. बटलरच्या साथीत चौथ्या विकेटसाठी रुटने 63 धावा जोडल्या. या दरम्यान त्याने आपले अर्धशतक साजरे केले. 

चाळिसाव्या षटकापर्यंत इंग्लंडचे चार फलंदाज बाद झाले होते. पण, निराश झालेल्या भारतीय गोलंदाजांवर स्टोक्‍सने हल्ला चढवला. आक्रमक फटकेबाजी करून त्याने इंग्लंडचे आव्हान भक्कम राहील याची काळजी घेतली. हाणामारीच्या नादात स्टोक्‍स जरूर बाद झाला. पण, तोवर त्याने इंग्लंडची धावसंख्या सव्वा तीनशेच्या जवळ नेली. अखेरच्या षटकात वोक्‍स-विली जोडीने 12 धावा फटकावल्या. अखेरच्या 10 षटकांत इंग्लंडने 115 धावा कुटल्या. 

पहिल्या 'षटकाराचा' वाढदिवस 
क्रिकेट इतिहासातला पहिला षटकार कसोटी सामना चालू झाल्यावर तब्बल 21 वर्षांनी मारला गेला. 1898 सालाअगोदर जमिनीलगतच्या फटक्‍याला चौकार मिळत असे आणि हवेतून मारलेला फटका सीमारेषेवरून गेला तर 5 धावा दिल्या जायच्या. 15 जानेवारी 1898 रोजी ऍडलेडला चालू असलेल्या कसोटी सामन्यात ऑसी फलंदाज ज्यो डार्लिंगने मारलेला फटका थेट मैदानाबाहेर जाऊन पडला म्हणून पंचांनी मान म्हणून 5 ऐवजी 6 धावा दिल्या. तोच क्रिकेट इतिहासातला पहिला षटकार ठरला. 

सगळे सुरळीत 
11.30 वाजल्यापासूनच प्रेक्षकांनी मैदानावर गर्दी करायला सुरवात केली होती. रविवारचा दिवस असल्याने हिंजवडी आयटी ऑफिसेस बंद असल्याने त्या मानाने गर्दी कमी होती. लवकर मैदानाकडे जाणाऱ्या लोकांना कोणताही त्रास न होता मैदानात पोचता आले. सामन्याअगोदर एक तास मात्र तुफान गर्दीने ट्रॅफिक तुंबले. दक्ष पोलिसांनी जातीने लक्ष घालून वाहनचालकांना शिस्त पाळायला भाग पाडले. खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहात सामना चालू झाल्यावरचे दृश्‍य विलोभनीय होते. पहिल्या एक दिवसीय सामन्याच्या आयोजनावर शंका करणाऱ्या लोकांना चांगलीच चपराक बसली इतकी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची व्यवस्था चोख होती. 

मोबाईल नेटवर्क झाले जॅम 
मैदान प्रेक्षकांनी भरल्यावर बरेच लोक आपापली सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट करायला लागले. बघता बघता मोबाईल नेटवर्क जॅम झाले. पत्रकार कक्षातील वायफाय इंटरनेटवर सोशल मीडिया साइट्‌स ब्लॉक केल्या गेल्याने फेसबुक किंवा ट्विटर वापरणे शक्‍य झाले नाही. अखेर मोबाईल फोन बाजूला ठेवून सगळे सामन्यात रंगून गेले. 
 

Web Title: india vs england : India's big victory in pune match