केदारची एकाकी झुंज; भारताचा 5 धावांनी पराभव

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

डावाच्या मध्यावर भारत पिछाडीवर पडला होता; पण केदार जाधव (90) आणि हार्दिक पंड्या (56) यांनी केलेल्या वेगवान शतकी भागीदारीने आव्हानात जान आणली. हळूहळू सामना भारताच्या बाजूने झुकू लागला होता. अखेरच्या षटकांत 16 धावांची गरज असताना केदारने षटकार आणि चौकार मारून चैतन्य निर्माण केले, परंतु दोन चेंडूंत सहा धावांची गरज असताना तो बाद झाला. केदारने 75 चेंडूत 90 धावांची शानदार खेळी केली. 

चुरशीच्या सामन्यात भारताचा निसटता पराभव; पण मालिका 2-1 जिंकली 

कोलकता : अखेरच्या चेंडूपर्यंत श्‍वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात पुणेकर केदार जाधवने दिलेली शर्थीची झुंज अपयशी ठरली आणि हातातोंडाशी आलेल्या विजयापासून भारताला विजयापासून वंचित राहावे लागले. कोलकत्यात ईडन गार्डन मैदानावर रविवारी झालेला हा सामना इंग्लंडने 5 धावांनी जिंकला; पण तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 2-1 अशी जिंकली. 

मालिकेत पुन्हा एकदा त्रिशतकी धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात डावाच्या मध्यावर भारत पिछाडीवर पडला होता; पण केदार जाधव (90) आणि हार्दिक पंड्या (56) यांनी केलेल्या वेगवान शतकी भागीदारीने आव्हानात जान आणली. हळूहळू सामना भारताच्या बाजूने झुकू लागला होता; पण अखेरच्या षटकांत जिगरबाज केदार बाद झाला आणि इंग्लंडला व्हाइटवॉश देण्याचे प्रयत्न अपुरे ठरले. अखेरच्या षटकांत 16 धावांची गरज असताना केदारने षटकार आणि चौकार मारून चैतन्य निर्माण केले, परंतु दोन चेंडूंत सहा धावांची गरज असताना तो बाद झाला. केदारने 75 चेंडूत 90 धावांची शानदार खेळी केली. 

तत्पूर्वी, सलामीला धवनऐवजी रहाणे असा बदल करण्यात आला तरी अपयशाची रड कायम राहिली. 2 बाद 27 नंतर विराट (55) आणि युवराज (45) यांना डाव सावरला खरा; परंतु त्यांचा स्ट्राईक रेट 87 आणि 78 असा होता. एरवी हाच स्ट्राइक रेट शंभरच्या पुढे असतो. या दोघांसह धोनीही डावाच्या मध्यावर बाद झाला, त्या वेळी भारताची पराभवाकडे वाटचाल होत होती; परंतु केदार आणि पंड्या यांचा प्रतिकार कौतुकास्पद ठरला. 

17 डावांत कर्णधार म्हणून कोहलीच्या एक हजार धावा. यापूर्वी डिव्हिलर्स 18 डावांत एक हजार धावा केल्या होत्या. 

वेगवान गोलंदाजांना सुरवातीला साथ मिळू शकेल असा अंदाज बांधून दुपारी नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली; परंतु त्याचा फायदा इंग्लंडच्या सलामीवीरांनीच अधिक घेतला. भारताला पहिली विकेट मिळवण्यासाठी 18 व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. तोपर्यंत जेसन रॉय आणि सॅम बिलिंग्ज यांनी 98 धावा फलकावर लावल्या होत्या. 
जडेजाने या दोघांना बाद केल्यानंतरही भारतीय गोलंदाजांसमोर तिसऱ्या यशासाठी वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. इंग्लंड कर्णधार मॉर्गनने एका बाजूने सूत्रे आपल्या हाती घेतली होती. बेअरस्टॉ त्याचा चांगली साथ देत होता. या दरम्यान ही जोडी फोडण्याची संधी भारताला मिळाली होती; परंतु बुमराची नोबॉलची चूक महागात पडली. त्याने बेअरस्टॉला बाद केले खरे; पण तो नोबॉल होता. त्यामुळे मिळालेल्या फ्री-हिटवर मॉर्गनने षटकारही मारला. 

30 व्या षटकातच इंग्लंडने दोनशे धावांचा टप्पा गाठला. भारतीयांची चिंता वाढत असताना पहिल्या हप्त्यात महागडा ठरणाऱ्या पंड्याने मोठा दिलासा दिला. मॉर्गन, बेअरस्टॉ आणि बटलर असे तीन फलंदाज बाद केले त्यामुळे 3 बाद 212 वरून इंग्लंडची 5 बाद 237 अशी अवस्था झाली होती. त्यातच बुमराने मोईन अलीला माघारी धाडले. अखेरच्या दहा षटकांचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या सहापेक्षा कमी सरासरीची होती; पण बेन स्टोक्‍सने प्रतिहल्ला केला. 146 च्या स्ट्राइक रेटने त्याने 57 धावा फटकावल्या त्यामुळे तीनशे धावांच्या आत रेंगाळू शकणाऱ्या इंग्लंडने 321 धावा केल्या. 

भारत 
अजिंक्‍य रहाणे त्रि. गो. विली 1, लोकेश राहुल झे. बटलर गो. बॉल 11, विराट कोहली झे. बटलर गो. स्टोक्‍स 55 (63 चेंडू, 8 चौकार), युवराज सिंग झे. बिलिंग्ज गो. प्लंकेट 45, महेंद्रसिंह धोनी झे. बटलर गो. बॉल 25, केदार जाधव झे. बिलिंग्ज गो. वोक्‍स 90 (75 चेंडू, 12 चौकार, 1 षटकार), हार्दिक पांड्या त्रि. गो. स्टोक्‍स 56 (43 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार), रवींद्र जडेजा झे. बेअरस्टॉ गो. वोक्‍स 10, आर. आश्‍विन झे. वोक्‍स गो. स्टोक्‍स 1, भुवनेश्‍वर नाबाद 0 जसप्रित बुमरा नाबाद 0, अवांतर 22 
गडी बाद क्रम : 1-13, 2-37, 3-102, 4-133, 5-173, 6-277, 7-291, 8-297, 9-316 
गोलंदाजी : ख्रिस वोक्‍स 10-0-75-2 डेव्हिड विली 2-0-8-1, जॅक बॉल 10-0-56-2, लियाम प्लंकेट 10-0-65-1, बेन स्टोक्‍स 10-0-63-3, मोईन अली 8-0-41-0 

इंग्लंड 
जेसन रॉय त्रि. गो. जडेजा 82, ऍलेक्‍स हेल्स झे. धोनी गो. बुमरा 14, ज्यो रुट झे. कोहली गो. अश्‍विन 54, इयॉन मॉर्गन धावबाद 102 (81 चेंडू, 6 चौकार, 5 षटकार), बेन स्टोक्‍स त्रि. गो. अश्‍विन 1, जोस बटलर यष्टि. धोनी गो. अश्‍विन 10, मोईन अली त्रि. गो. भुवनेश्‍वर 55, ख्रिस वोक्‍स त्रि. गो. बुमरा 5, लियाम प्लंकेट नाबाद 25, डेव्हिड विली नाबाद 5, अवांतर 12, एकूण 50 षटकांत 8 बाद 366 
गडी बाद क्रम : 1-28, 2-128, 3-170, 4-174, 5-206, 6-299, 7-304, 8-354, 
गोलंदाजी : भुवनेश्‍वर 10-1-63-1, जसप्रीत बुमरा 9-0-81-2, रवींद्र जडेजा 10-045-1, हार्दिक पांड्या 6-0-60-0, आर. आश्‍विन 10-0-65-3, केदार जाधव 5-0-45-0 

Web Title: india vs england match: india wins by 2 wickets