अली, स्टोक्सची शतके; इंग्लंडच्या 537 धावा

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

पहिल्या दिवसअखेर 99 धावांवर नाबाद असलेल्या मोईन अलीने आपले शतक पूर्ण केले. त्याच्यासोबत असलेल्या बेन स्टोक्स याने फटकेबाजी करत झटपट धावा बनविण्यास सुरवात केली. पण, 117 धावांवर असताना शमीने अलीचा त्रिफळा उडवत आजच्या दिवसातील पहिले यश भारताला मिळवून दिले.

राजकोट - ज्यो रूट पाठोपाठ मोईन अली आणि बेन स्टोक्स यांनी झळकाविलेल्या शतकांमुळे इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारतापुढे धावांचा डोंगर उभा केला आहे. इंग्लंडचा पहिला डाव 537 धावा केल्या आहेत.

पहिल्या दिवसापाठोपाठ आज (गुरुवार) दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातही इंग्लंडच्या फलंदाजांचेच वर्चस्व पहायला मिळाले. पहिल्या दिवसअखेर 99 धावांवर नाबाद असलेल्या मोईन अलीने आपले शतक पूर्ण केले. त्याच्यासोबत असलेल्या बेन स्टोक्स याने फटकेबाजी करत झटपट धावा बनविण्यास सुरवात केली. पण, 117 धावांवर असताना शमीने अलीचा त्रिफळा उडवत आजच्या दिवसातील पहिले यश भारताला मिळवून दिले. त्यानंतरही स्टोक्सने फटकेबाजी सुरुच ठेवत अर्धशतक पूर्ण केले. त्याला बेरस्ट्रॉने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 46 धावा करत चांगली साथ दिली. अखेर शमीनेच बेरस्ट्रॉला बाद करत लंचपूर्वी इंग्लंडला आणखी एक धक्का दिला.

त्यापूर्वी, पहिल्या दिवशी यमजान देशात सर्वत्र शंभराच्या चलनी नोटांचे महत्त्व वाढले असताना इंग्लंडच्या ज्यो रूटने शतकाचे खणखणीत नाणे सादर केले. भारतीय गोलंदाजांना पुरते निष्प्रभ केले. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर 4 बाद 311 अशी भक्कम सुरवात केली होती. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मर्दुमकी गाजवून कसोटी क्रमवारीत अव्वल ठरलेल्या भारतीयांची गोलंदाजी फलंदाजीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर रूट व मोईन यांनी पहिल्या दिवशी तरी चिल्लर ठरवली. 93 षटकांच्या खेळात अवघे चारच फलंदाज बाद झाले. उपाहार ते चहापान या सत्रात भारताला एकही यश मिळाले नाही. येथेच भारतीय गोलंदाजीची निष्प्रभता अधोरेखित झाली. त्यातच क्षेत्ररक्षणातील ढिसाळपणाही भोवला.

कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून विराट कोहलीशी रूटची तुलना केली जाते. त्याने पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्याच दिवशी इंग्लंडची पाळेमुळे घट्ट रोवली. सहजसुंदर फलंदाजी करत त्याने लीलया तीन अंकी धावसंख्या पार केली. 11 चौकार व एका षटकारासह त्याने 124 धावा केल्या. त्याने मोईनसह चौथ्या विकेटसाठी 3.70 च्या सरासरीने 179 धावांची भागीदारी केली.

क्रीडा

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीतून अद्याप पूर्ण तंदुरुस्त झाला नसल्याने आगामी भारत...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

दिल्लीचा विजय, तर गुजरातची बरोबरी अहमदाबाद - घरच्या मैदानावर गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सला आपली विजयी मालिका अखेरच्या दिवशी कायम...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमे विराट कोहलीबद्दल सतत टीका करत असली, तरी माझ्यासह त्याचे ऑस्ट्रेलियात असंख्य चाहते असल्याचे...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017