भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटींग

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

भारत विंडीज दौऱ्यावर असून, या दौऱ्यात भारतीय संघ पाच एकदिवसीय आणि दोन टी-20 सामने खेळणार आहे. भारतीय संघ प्रशिक्षकाशिवाय या दौऱ्यावर गेला आहे.

पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनीदाद) - भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पावसामुळे वाया गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

भारताने सुरवातीला फलंदाजी करताना 39.2 षटकांत 3 बाद 199 धावा केल्या होत्या. सलामीला अजिंक्‍य रहाणेने 78 चेंडूंना सामोरे जाताना आठ चौकारांसह 62 धावा केल्या. शिखर धवनने फॉर्म कायम राखत 87 धावा फटकावल्या. त्याने 92 चेंडूंचा सामना करताना आठ चौकार व दोन षटकार खेचले. या जोडीने 132 धावांची सलामी दिली. युवराज 10 चेंडूंमध्ये चार धावा काढून बाद झाला. विराट 32 धावांवर, तर धोनी नऊ धावांवर नाबाद होते. त्यावेळी पावसास सुरवात झाली. अखेर पावसाचा जोर वाढल्याने सामना अनिर्णित घोषित करावा लागला.

भारत विंडीज दौऱ्यावर असून, या दौऱ्यात भारतीय संघ पाच एकदिवसीय आणि दोन टी-20 सामने खेळणार आहे. भारतीय संघ प्रशिक्षकाशिवाय या दौऱ्यावर गेला आहे.