भारताचा इंग्लंडवर 5 धावांनी रोमहर्षक विजय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

नागपूर- सुरवातीला इंग्लंडसाठी सहज शक्य वाटणारे 144 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडच्या संघाला शेवटच्या षटकापर्यंत निकराचे प्रयत्न करावे लागले. मात्र, त्यांना यश आले नाही, आणि गोलंदाजांनी भारताला विजय मिळवून दिला. बुमराहचे अखेरचे षटक निर्णायक ठरले. 

गोलंदाजांच्या जोरावर टी-20 सामन्यातही शेवटपर्यंत नियंत्रण ठेवता येते हे भारतीय संघाने दाखवून दिले. फार मोठे आव्हान नसतानाही दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडच्या संघाला अखेरपर्यंत झगडावे लागले. 
शेवटी इंग्लंडला 10 चेंडूंमध्ये 21 धावा आवश्क होत्या. जोस बटलरने चौकार ठोकून हे आव्हान 8 चेंडूंमध्ये 16 धावा असे सोपे करून ठेवले. 

त्यानंतर अखेरच्या षटकात 6 चेंडूंत 7 धावा आवश्यक असताना आणखी एक बळी गेल्याने टी-20 च्या या कहाणीमध्ये ऐनवेळी ट्विस्ट आला. बुमराहने अखेरच्या षटकात उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने पहिल्या 4 चेंडूंमध्ये 2 गडी बाद करीत फक्त एक धाव दिली. त्यामुळे भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या. इंग्लंडला 2 चेंडूंमध्ये 7 धावा हव्या होत्या. पुढील चेंडूवर एकच धाव निघाल्याने 1 चेंडूत 6 धावा आवश्यक होत्या. 

गोलंदाजीमध्ये नेहराने महत्त्वाचे तीन बळी घेतले. तत्पूर्वी, भारताच्या फलंदाजांनी 8 गडी गमावत 144 धावा केल्या.