ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा विजयी संघ कायम

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

संघ पुढीलप्रमाणे -
विराट कोहली (कर्णधार, मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, करुण नायर, जयंत यादव, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद आणि हार्दिक पांड्या.

मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज (मंगळवार) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, विजयी संघात मोठा बदल करण्यात आलेला नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने आज संघ जाहीर करताना गेल्या सहा मालिकांमध्ये विजयी राहिलेल्या संघात बदल केलेले दिसत नाहीत. भारतीय संघात चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव आणि सलामीवीर अभिनव मुकुंद हे नवे चेहरे आहेत. या दोघांना बांगलादेशविरुद्धही अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्धही संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. के. एल. राहुल हा गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरूनही त्याला संघात कायम ठेवण्यात आले आहे. दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्माला वगळण्यात आले आहे. तर, शिखर धवनलाही संघाबाहेरच ठेवण्यात आले आहे. निवड समितीने आश्विन आणि जडेजा या फिरकीपटूंवरच विश्वास ठेवल्याचे दिसून येत आहे. अमित मिश्राला दुखापतग्रस्त असल्याने त्याची संघात निवड करण्यात आलेली नाही.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या सहा कसोटी मालिकांमध्ये विजय मिळविलेला आहे. तर, सलग त्याच्या नेतृत्वाखाली सलग 19 कसोटी सामने भारताने जिंकले आहेत. आता ही मालिका 4-0 अशी जिंकली, तर त्याला रिकी पाँटिंगचा विक्रम मोडण्याची संधी आहे. 

संघ पुढीलप्रमाणे -
विराट कोहली (कर्णधार, मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, करुण नायर, जयंत यादव, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद आणि हार्दिक पांड्या.

कसोटी मालिका वेळापत्रक -

  • पहिली कसोटी - 23 ते 27 फेब्रुवारी (पुणे)
  • दुसरी कसोटी - 4 ते 8 मार्च (बंगळूर)
  • तिसरी कसोटी - 16 ते 20 मार्च (रांची)
  • चौथी कसोटी - 25 ते 29 मार्च (धर्मशाला)
Web Title: Indian team for the first two Test matches of the four-match Test series against Australia