विजय भारताच्या दृष्टिक्षेपात

पीटीआय
मंगळवार, 28 मार्च 2017

धरमशाला - रवींद्र जडेजाच्या जिगरबाज फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक चौथ्या कसोटीतील विजय तिसऱ्या दिवसअखेरीस भारताच्या दृष्टिक्षेपात आला. बोर्डर-गावसकर करंडक पटकाविण्यासाठी भारतासमोर १०६ धावांचे माफक आव्हान मिळाले. त्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेरीस भारताने बिनबाद १९ धावा केल्या. कसोटी आणि मालिका विजयासाठी आता त्यांना केवळ ८७ धावांची आवश्‍यकता आहे. लोकेश राहुल १३ आणि मुरली विजय सहा धावांवर खेळत होता. 

धरमशाला - रवींद्र जडेजाच्या जिगरबाज फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक चौथ्या कसोटीतील विजय तिसऱ्या दिवसअखेरीस भारताच्या दृष्टिक्षेपात आला. बोर्डर-गावसकर करंडक पटकाविण्यासाठी भारतासमोर १०६ धावांचे माफक आव्हान मिळाले. त्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेरीस भारताने बिनबाद १९ धावा केल्या. कसोटी आणि मालिका विजयासाठी आता त्यांना केवळ ८७ धावांची आवश्‍यकता आहे. लोकेश राहुल १३ आणि मुरली विजय सहा धावांवर खेळत होता. 

चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व राखले. अर्थात, रवींद्र जडेजा आणि वृद्धिमान साहा यांनी जिगरबाज फलंदाजी करून भारताला पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळवून दिली. जडेजाने आक्रमक फलंदाजी करताना ६३ धावांची खेळी केली. भारताची आघाडी ३२ धावांवरच मर्यादित राहिली असली, तरी उसळी (बाऊन्स) मिळणाऱ्या खेळपट्टीवर ही आघाडीदेखील निर्णायक ठरली. याच आघाडीच्या दडपणाखाली ऑस्ट्रेलियाचे फलंदाज गडबडले आणि भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या भोवतीचा फास घट्ट आवळला. त्यामुळेच त्यांचा दुसरा डाव ५३.५ षटकांत १३७ धावांत आटोपला. 

भारताच्या उर्वरित चार फलंदाजांना झटपट गुंडाळण्याचे मनसुबे आज तिसऱ्या दिवसाच्या सुरवातीला जडेजा-साहा या भारतीय जोडीने हाणून पाडले. साहाने सावधपणा अवलंबल्यावर दुसरीकडून जडेजाने आक्रमक धोरण स्वीकारले. या दोघांच्या ९६ धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाचे खच्चीकरण झाले. ही जोडी फुटल्यावर भारताचा डाव फारसा लांबला नाही. भारताचा पहिला डाव ३३२ धावांवर संपुष्टात आला. 

पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर भारतीय गोलंदाज पहिल्या षटकापासून ऑस्ट्रेलियाला धक्का देण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरले. पण, करुण नायरने वॉर्नरचा सोपा झेल सोडला. अर्थात, यामुळे फारसे नुकसान झाले नाही. यादवने त्याला बाद केले. भारतीय गोलंदाजांनी या वेळी स्मिथला वेगळ्या टप्प्यावर गोलंदाजी केली. रहाणेने त्यानुसार क्षेत्ररचनेतही बदल केला. भुवनेश्‍वरला भिरकावण्याचा स्मिथचा प्रयत्न फसला. चेंडूने बॅटची कड घेऊन त्याच्या यष्टीचा वेध घेतला. मालिकेत कोहलीच्या विकेटने ऑस्ट्रेलियन बेभान व्हायचे तसेच झाले. भारतीय गोलंदाजांच्या आनंदला उधाण आले. कोहली बाद झाल्यावर भारताचे अन्य फलंदाज सातत्याने खेळले. त्याउलट स्मिथ बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. रेनशॉ, हॅंड्‌सकोम्ब, मार्श झटपट बाद झाले.  

मॅक्‍सवेलने आक्रमक फलंदाजी केली. वेड त्याच्या साथीला होता. पण, अश्‍विनने मॅक्‍सवेलला बाद करून ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळणे हीच केवळ औपचारिकता राहिली. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात १३७ धावांत रोखून भारतीय गोलंदाजांनी आपल्यासमोरचे आव्हान मर्यादित ठेवले.

वैशिष्ट्ये तिसऱ्या दिवसाची
ऑस्ट्रेलियाचे दोन्ही डाव १५० षटकांच्या आत आटोपण्याची भारताविरुद्धची चौथी वेळ. या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४२.२ षटके खेळ. यापूर्वी पर्थ (०७-०८), मुंबई (०४-०५) आणि मेलबर्न (७७-७८)

एका मोसमात पाचशे धावा आणि ५० अधिक विकेट्‌स घेणारा रवींद्र जडेजा तिसरा अष्टपैलू. यापूर्वी अशी कामगिरी कपिल देव (१९७९-८०), मिशेल जॉन्सन (२००८-०९)
एका मोसमात (२०१६-१७) रवींद्र जडेजाची सहा अर्धशतके. विराट कोहली, मुरली विजय, राहुलच्या कामगिरीशी बरोबरी रवींद्र जडेजाच्या एका मोसमात ६८ विकेट्‌स. सर्वाधिक विकेट्‌स आश्‍विनच्या

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ३००, भारत पहिला डाव ६ बाद २४८ वरून पुढे... वृद्धिमान साहा झे. स्मिथ गो. कमिन्स ३१, रवींद्र जडेजा त्रि. गो. कमिन्स ६३ -९५ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार, भुवनेश्‍वर कुमार झे. स्मिथ गो. ओकिफ ०, कुलदीप यादव झे. हेझलवूड गो. लायन ७, उमेश यादव नाबाद २, अवांतर २०, एकूण ११८.१ षटकांत सर्वबाद ३३२

गडी बाद क्रम - ७-३१७, ८-३१८, ९-३१८, १०-३३२

गोलंदाजी - जोश हेझलवूड २५-८-५१-१, पॅट कमिन्स ३०-८-९४-३, नॅथन लायन ३४.१-५-९२-५, स्टिव्ह ओकिफ २७-४-७५-१, ग्लेन मॅक्‍सवेल २-०-५-०

ऑस्ट्रेलिया दुसरा डाव - मॅट रेनशॉ झे. साहा गो. यादव ८, डेव्हिड वॉर्नर झे. साहा गो. यादव ६, स्टिव्ह स्मिथ त्रि. गो. भुवनेश्‍वर १७, पीटर हॅंड्‌सकोम्ब झे. रहाणे गो. आश्‍विन १८, ग्लेन मॅक्‍सवेल पायचित गो. आश्‍विन ४५, शॉन मार्श झे. पुजारा गो. जडेजा १, मॅथ्यू वेड नाबाद २५, पॅट कमिन्स झे. रहाणे गो. जडेजा १२, स्टिव्ह ओकिफ झे. पुजारा गो. जडेजा ०, नॅथन लायन झे. विजय गो. यादव ०, जोश हेझलवूड पायचित गो. आश्‍विन ०, अवांतर ५, एकूण ५३.५ षटकांत १३७

गडी बाद क्रम - १-१०, २-३१, ३-३१, ४-८७, ५-९२, ६-१०६, ७-१२१, ८-१२१, ९-१२२

गोलंदाजी - भुवनेश्‍वर कुमार ७-१-२७-१, उमेश यादव १०-३-२९-३, कुलदीप यादव ५-०-२३-०, रवींद्र जडेजा १८-७-२४-३, आर. आश्‍विन १३.५-४-२९-३

भारत दुसरा डाव
लोकेश राहुल खेळत आहे १३, मुरली विजय खेळत आहे ६ अवांतर ० एकूण ६ षटकांत बिनबाद १९

गोलंदाजी - पॅट कमिन्स ३-१-१४-०, जोश हेझलवूड २-०-५-०, स्टिव्हग ओकिफ १-१-०-०

Web Title: India's victory glance