आयपीएल लिलाव: स्टोक, मिल्सची कोटींची भरारी

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

करारानुसार हा अखेरचा लिलाव असल्यामुळे फ्रॅंचाइजी किती खर्च करतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. पुढील वर्षी सर्वच खेळाडू लिलावासाठी पात्र ठरणार असल्यामुळे या वर्षी कुणाला घ्यायचे? कुणाला नाही? यासाठी फ्रॅंचाइजींचे "थिंक टॅंक' चांगलेच व्यग्र आहेत. 

बंगळूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या संघाची विजयी घोडदौड एकीकडे चालू असतानाच दुसरीकडे चाहत्यांमध्ये आकर्षण असणाऱ्या 'आयपीएल'च्या लिलावात इंग्लंडचे खेळाडू बेन स्टोक आणि टायमल मिल्स यांना सर्वाधिक बोली लावून खरेदी करण्यात आले. स्टोक्सला तब्बल 14.50 कोटी रुपयांना रायझिंग पुणे सुपरजायंट्सने आणि मिल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने 12 कोटी रुपयांना खरेदी केले.

आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी आज (सोमवार) बंगळूरमध्ये क्रिकेटपटूंचा लिलाव झाला. एकूण 551 क्रिकेटपटूंसाठी बोली लागणार आहे. करारानुसार हा अखेरचा लिलाव असल्यामुळे फ्रॅंचाइजी किती खर्च करतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. पुढील वर्षी सर्वच खेळाडू लिलावासाठी पात्र ठरणार असल्यामुळे या वर्षी कुणाला घ्यायचे? कुणाला नाही? यासाठी फ्रॅंचाइजींचे "थिंक टॅंक' चांगलेच व्यग्र आहेत. 

फ्रॅंचाइजींना खर्च करण्यासाठी कोट्यवधी रुपये असले, तरी फलंदाज, गोलंदाज यापेक्षा अष्टपैलू खेळाडूंकडे फ्रॅंजाइजी मालकांचा कल अधिक होता. त्यामुळेच यंदा बेन स्टोक्‍सच्या नावाची चांगलीच हवा होती. लिलावासाठी स्टोक्‍सची 2 कोटी पायाभूत किंमतीपासून लिलावात त्याची सुरवात झाली. सर्वच फ्रेंचायजींनी त्याच्या खरेदीसाठी चढाओढ केल्याने त्याला अखेर पुणे संघाने 14.50 कोटी रुपयांना खरेदी केली. तर, दुसरीकडे गेल्या लिलावात 8.50 कोटी रुपये मिळालेल्या पवन नेगीला अवघे 1 कोटी रुपये मिळाले. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने विकत घेतले. इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार इयान मॉर्गनला किंग्ज इलेव्हन पंजाबने आणि श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला दिल्ली डेअरडेव्हिल्सने प्रत्येकी 2 कोटींना खरेदी केले. भारताविरुद्धच्या मालिकेतील यशाचे फळ गोलंदाज मिल्सला मिळाले. त्याला 12 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले.

बंगळूर आणि हैदराबाद यांच्यात दहाव्या मोसमाची पहिली लढत होणार असली, तरी आज येथील स्टार हॉटेलमध्ये मैदानाबाहेरचे लिलावाचे नाट्य रंगले. लिलाव करण्यासाठी प्रसिद्ध असणारे वेल्सचे रिचर्ड मेडले यांनी लिलावाचा हातोडा सांभाळला. लिलावातून 75 खेळाडूंची निवड होणार असली, तरी यासाठी तब्बल 352 क्रिकेटपटू उपलब्ध होते 

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असले, तरी ते पूर्ण मोसम खेळू शकणार नाहीत. दोन्ही देशांमध्ये मे महिन्यातच द्विपक्षीय मालिका असल्यामुळे या खेळाडूंना मेच्या पहिल्या आठवड्यातच "आयपीएल'चा निरोप घ्यावा लागणार आहे.

आयपीएल लिलाव
खेळाडू संघ किंमत
बेन स्टोक्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स 14.50 कोटी
टायमल मिल्स रॉयल चॅलेंजर्स बंगळूर 12 कोटी
कगिसो रबाडा दिल्ली डेअरडेव्हिल्स 5 कोटी
ट्रेंट बोल्ट कोलकता नाईट रायडर्स 5 कोटी
पॅट कमिन्स दिल्ली डेअरडेव्हिल्स 4.50 कोटी
ख्रिस वोक्स कोलकता नाईट रायडर्स 4.20 कोटी
रशीद खान सनरायझर्स हैदराबाद 4 कोटी
कर्ण शर्मा मुंबई इंडियन्स 3.20 कोटी
टी. नटराजन किंग्ज इलेव्हन पंजाब 3 कोटी
वरुण ऍरॉन किंग्ज इलेव्हन पंजाब 2.80 कोटी
मिशेल जॉन्सन मुंबई इंडियन्स 2 कोटी
इयान मॉर्गन किंग्ज इलेव्हन पंजाब 2 कोटी
अँजेलो मॅथ्यूज दिल्ली डेअरडेव्हिल्स 2 कोटी
कृष्णप्पा गौथम मुंबई इंडियन्स 2 कोटी
पवन नेगी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर 1 कोटी
कोरे अँडरसन दिल्ली डेअरडेव्हिल्स 1 कोटी
एम. अश्विन दिल्ली डेअरडेव्हिल्स 1 कोटी
बसील थम्पी गुजरात लायन्स 85 लाख
एकलव्य द्विवेदी सनरायझर्स हैदराबाद 75 लाख
मनप्रीत गोनी गुजरात लायन्स 60 लाख
हृषी धवन कोलकता नाईट रायडर्स 55 लाख
मॅट हेन्री किंग्ज इलेवह्न पंजाब 50 लाख
नथु सिंह गुजरात लायन्स 50 लाख
निकोलस पुरन मुंबई इंडियन्स 30 लाख
महंम्मद नबी सनरायझर्स हैदराबाद 30 लाख
जयदेव उनाडकट रायझिंग पुणे सुपरजायंट्स 30 लाख
राहुल तेवातिया किंग्ज इलेव्हन पंजाब 25 लाख
आदित्य तरे दिल्ली डेअरडेव्हिल्स 25 लाख
अंकित बावणे दिल्ली डेअरडेव्हिल्स 10 लाख
तन्मय अग्रवाल सनरायझर्स हैदराबाद 10 लाख
प्रवीण तांबे सनरायझर्स हैदराबाद 10 लाख
तेजस बरोका गुजरात लायन्स 10 लाख