पंजाबची गुजरातवर 26 धावांनी मात

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

पंजाबचा प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर यंदा हा पहिलाच विजय आहे. पंजाबने 188 अशी भक्कम धावसंख्या उभारली. गुजरातला 162 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिनेश कार्तिकची झुंज अपयशी ठरली.

राजकोट - पंजाबने आयपीएलच्या दहाव्या मोसमात गुजरातवर 26 धावांनी मात केली.

पंजाबचा प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर यंदा हा पहिलाच विजय आहे. पंजाबने 188 अशी भक्कम धावसंख्या उभारली. गुजरातला 162 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिनेश कार्तिकची झुंज अपयशी ठरली. संदीप, करिअप्पा व अक्षर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. 

संक्षिप्त धावफलक 
किंग्ज इलेव्हन पंजाब ः 20 षटकांत 7 बाद 188 (हशीम अमला 65 - 40 चेंडू, 9 चौकार, 2 षटकार, शॉन मार्श 30, ग्लेन मॅक्‍सवेल 31 - 18 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार, अक्षर पटेल 34 - 17 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, नथू सिंग 2-0-7-1, अँड्य्रू टाय 4-0-35-2) विवि गुजरात लायन्स ः 20 षटकांत 7 बाद 162 (ब्रॅंडन मॅक्‌लम 6, ऍरन फिंच 13, सुरेश रैना 32 - 24 चेंडू, 4 चौकार, दिनेश कार्तिक नाबाद 58 - 44 चेंडू, 6 चौकार, टाय 22 - 12 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, संदीप शर्मा 4-0-40-2, के. सी. करिअप्पा 4-0-24-2, अक्षर पटेल 4-0-36-2)