विंडीजच्या जेरोम टेलरची कसोटीतून निवृत्ती

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जुलै 2016

सेंट किट्‌स : भारताविरुद्धच्या आगामी क्रिकेट कसोटी मालिकेपूर्वीच वेगवान गोलंदाज जेरोम टेलर याने कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्याने वेस्ट इंडीजच्या संघाला धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठीच्या मूळ संघात टेलरची निवड झाली होती; मात्र निवृत्तीची त्याने अधिकृतरित्या कल्पना दिल्यानंतर त्याला या संघातून वगळण्यात आले. एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 क्रिकेटमधील कारकिर्द वाढविण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 

वेस्ट इंडीजच्या कसोटी संघामध्ये टेलरची जागा पक्की नव्हती. गेल्या 13 वर्षांत तो 46 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने 130 बळी मिळविले. दुखापतींमुळे तो कायम संघाच्या आत-बाहेरच राहिला. 2009 ते 2014 अशी तब्बल पाच वर्षे त्याला कसोटी संघात स्थान मिळाले नव्हते. यापूर्वी यंदाच्या जानेवारीमध्ये सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटीमध्ये टेलरला स्थान मिळाले होते. यात त्याला एकही बळी मिळविता आला नव्हता. या संपूर्ण मालिकेत त्याला केवळ दोनच गडी बाद करता आले होते. 

क्रीडा

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याच्या वृत्ताचे खंडन करत माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादने आपण...

02.36 PM

मुंबई : गेल्या 'आयपीएल'मध्ये भन्नाट सूर गवसलेल्या कृणाल पांड्या आणि बसिल थम्पी यांनी भारतीय 'अ' संघामध्ये स्थान पटकाविले आहे...

02.30 PM

केंद्र सरकारच्या आग्रहामुळे जागतिक फुटबॉल महासंघाचा निर्णय नवी दिल्ली - विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील भारताच्या...

10.03 AM