कोलकत्याचा धडाका कायम 

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

कोलकता : कोलकता नाईट रायडर्सने आणखी एक शानदार विजय मिळवला आणि यंदाच्या आयपीएलमधील आपली घोडदौड अधिक वेगवान केली. आजच्या सामन्यात त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सात विकेट व 22 चेंडू राखून मात केली. 

यंदाच्या आयपीएलमध्ये समतोल संघ म्हणून पाहण्यात येणारा कोलकता मैदानावरही तशीच कामगिरी करत आहे. वेगवान सुरवात करणाऱ्या दिल्लीचे अखेरच्या 30 चेंडूंत (पाच षटकांत) 29 धावांत चार फलंदाज बाद केले. त्यामुळे दिल्लीला 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. हे आव्हान कोलकताने गंभीर (नाबाद 71) व रॉबिन उथप्पा (59) यांच्या वेगवान फलंदाजीच्या जोरावर सहज पार केले. 

आजच्या सामन्यात सुनील नारायणला सलामीला खेळवण्याची चाल यशस्वी ठरली नसली तरी, उथप्पाने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीचा हिसका दाखवला. त्याने पाच चौकार व चार षटकारांची आतषबाजी केली. गंभीर सुरवातीला सावध होता; परंतु जम बसल्यानंतर त्यानेही 11 चौकारांची पेरणी केली. 

संक्षिप्त धावफलक 
दिल्ली डेअरडेव्हिल्स :
20 षटकांत 6 बाद 160 (संजू सॅमसन 60- 38 चेंडू, 4 चौकार, 3 षटकार, श्रेयस अय्यर 47- 34 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, नॅथन कुल्टर-नाईल 34-3, नारायण 25-1)

पराभूत वि. कोलकता नाइट रायडर्स : 16.2 षटकांत 3 बाद 161 (गौतम गंभीर नाबाद 71- 52 चेंडू, 11 चौकार, रॉबिन उथप्पा 59- 33 चेंडू, 5 चौकार, 4 षटकार; रबाडा 20-2).