'या' राहुलने टाकले 'त्या' राहुलला मागे

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

राहुलने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने यापूर्वी सलग सहा डावांमध्ये अर्धशतकी खेळी केलेली आहे. त्याने सलग सातव्यांदा अर्धशतक पूर्ण करून राहुल द्रविड आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांचा विक्रम मोडीत काढला.

पल्लीकल - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के. एल. राहुलने सलग सात डावांमध्ये अर्धशतक झळकाविण्याची कामगिरी करत विक्रम प्रस्थापित केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तर, त्याने विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

राहुलने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने यापूर्वी सलग सहा डावांमध्ये अर्धशतकी खेळी केलेली आहे. त्याने सलग सातव्यांदा अर्धशतक पूर्ण करून राहुल द्रविड आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांचा विक्रम मोडीत काढला. यापूर्वी राहुल द्रविड आणि गुंडाप्पा विश्वनाथ या दोघांची प्रत्येकी सहा अर्धशतके होती. के. एल. राहुल आता वेस्ट इंडिजचे एव्हर्टन वीक्स, शिवनारायण चंदरपॉल, झिंबाब्वेचा अँडी फ्लॉवर, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाचा ख्रिस्ती रॉजर्स यांच्या पंक्तित विराजमान झाला आहे. यांची प्रत्येकी सात अर्धशतके आहेत.

याबरोबरच राहुल आणि धवन यांच्या जोडीनेही श्रीलंकेत सलामीला सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम केला. श्रीलंकेत सलामीला सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम राहुल आणि शिखर धवन यांच्या जोडीने मोडला. यापूर्वी 1993 मध्ये मनोज प्रभाकर आणि नवज्योतसिंह सिद्धू यांनी 171 धावांची सलामीला भागीदारी केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :